शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: शिंदेसेनेतून आमदार पुत्र, माजी आमदार पुत्र, पुतणे यांच्यासह ३० जण रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:39 IST

कसबा बावड्यात एकाच चिन्हासाठी सर्व उमेदवार शिंदेसेनेचे..

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत महायुती आघाडीतील शिंदे सेनेने उमेदवारांची अधिकृत यादी मंगळवारी दुपारी प्रसिद्ध केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांचे पुत्र, पुतणे तर काँग्रेसमधून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांनाही उमेदवारी मिळाली आहे. महायुतीने एकत्रितपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच शिंदेसेनेने प्रभागनिहाय आपले उमेदवार जाहीर करण्यात बाजी मारली.महायुतीत शिंदेसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच झाली. उमेदवारीच्या जागेच्या तडजोडीत शिंदेसेनेच्या अनेक निष्ठावंतांना महायुतीतून उमेदवारी मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. याउलट निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षप्रवेश केलेले शारंगधर देशमुख, आश्कीन आजरेकर, अशोक जाधव यांच्या पत्नी, प्रकाश नाईकनवरे, अजय इंगवले, सत्यजित जाधव, अभिजीत खतकर, ओंकार जाधव यांना उमेदवारी मिळाली. अजित पवार राष्ट्रवादीतून आलेल्या अनुराधा खेडकर, शिवतेज खराडे यांना उमेदवारी मिळाली. यांना संधी मिळाल्याने या जागांवर निष्ठावंत इच्छुक शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना रिंगणातून बाहेर राहावे लागले.

वाचा : ‘जनसुराज्य’चे पाच म्हणता पंचवीस उमेदवार रिंगणात

कसबा बावड्यात एकाच चिन्हासाठी सर्व उमेदवार शिंदेसेनेचे..कसबा बावडा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक एक आणि दोनमधील सर्व आठही जागांवर शिंदेसेनेचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. येथे महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांना शिंदेसेनेतून संधी देण्यात आली आहे. काँग्रेसचे चिन्ह सलग असेल मग महायुतीची दोन चिन्हे झाल्यास संभ्रम होईल म्हणून महायुतीने ही दक्षता घेतली आहे.

माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारीमाजी नगरसेवक अशोक जाधव यांच्या पत्नी, माजी महापौर सुनील कदम यांचे पुत्र, माजी महापौर सरिता मोरे यांचे पती नंदकुमार, माजी नगरसेवक रमेश पोवार यांच्या पत्नी संगीता असे अनेक माजी नगरसेवकांच्या नातेवाईकांना उमेदवारी मिळाली आहे.

प्रभागनिहाय शिंदेसेनेचे उमेदवार असे :प्रभाग एक : अमर भगवान साठे (अनुसूचित जाती) , गीता अशोक जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), प्रियांका प्रदीप उलपे (सर्वसाधारण महिला), कृष्णा दिलीप लोंढे (सर्वसाधारण).प्रभाग दोन : वैभव दिलीप माने (अनुसूचित जाती), अर्चना उमेश पागर (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), प्राजक्ता अभिषेक जाधव ( सर्वसाधारण महिला) , स्वरूप सुनील कदम (सर्वसाधारण).प्रभाग चार : शुभांगी रमेश भोसले (अनुसूचित जाती महिला), सुनीता मारूती माने (सर्वसाधारण महिला) .प्रभाग पाच : अनिल हिंदूराव अधिक ( नागरिकांचा मागास प्रवर्ग), समीर सदाशिव यवलुजे (सर्वसाधारण) .प्रभाग सहा : शीला अशोक सोनुले (अनुसूचित जाती), नंदकुमार बाळकृष्ण मोरे (सर्वसाधारण).प्रभाग सात : मंगल महादेव साळोखे ( सर्वसाधारण महिला) , ऋतुराज राजेश क्षीरसागर (सर्वसाधारण) .प्रभाग आठ : अनुराधा सचिन खेडकर ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), शिवतेज इंद्रजीत खराडे (सर्वसाधारण).प्रभाग नऊ : संगीता संजय सावंत (सर्वसाधारण महिला) , शारंगधर वसंतराव देशमुख (सर्वसाधारण) .प्रभाग दहा : अजय पांडुरंग इंगवले (नागरिकांचा मागास प्रवर्ग) .प्रभाग अकरा : सत्यजित चंद्रकांत जाधव (सर्वसाधारण) .प्रभाग बारा : आश्किन गणी आजरेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग) , संगीता रमेश पोवार (सर्वसाधारण महिला).प्रभाग तेरा : ओंकार संभाजीराव जाधव (सर्वसाधारण ).प्रभाग चौदा : प्रकाशराव रामचंद्र नाईकनवरे (सर्वसाधारण), अजित जयसिंगराव मोरे ( अजित मोरे) .प्रभाग पंधरा : दुर्गेश उदयराव लिंग्रस (सर्वसाधारण) .प्रभाग अठरा : कौसर इस्माईल बागवान (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला).प्रभाग वीस : अभिजित शामराव खतकर ( सर्वसाधारण)

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Shinde Sena fields kin, ex-members for municipal polls.

Web Summary : Shinde Sena announced its Kolhapur election candidates, prioritizing ex-Congress members and relatives of prominent figures. Loyalists missed out due to alliance seat-sharing, favoring newcomers and family members of ex-councilors. Kasba Bawda sees all Shinde Sena candidates.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे