आमदार ऋतुराज पाटील यांचा रिक्षातून फेरफटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:22 IST2021-03-08T04:22:59+5:302021-03-08T04:22:59+5:30
कोल्हापूर : येथील रेखा दुधाणे या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्सधारक रिक्षाचालक आहेत. त्यांच्या रिक्षातून आमदार ऋतुराज पाटील यांनी फेरफटका ...

आमदार ऋतुराज पाटील यांचा रिक्षातून फेरफटका
कोल्हापूर : येथील रेखा दुधाणे या महाराष्ट्रातील पहिल्या लायसन्सधारक रिक्षाचालक आहेत. त्यांच्या रिक्षातून आमदार ऋतुराज पाटील यांनी फेरफटका मारला. अधिवेशनासाठी मुंबईला जावे लागणार असल्याने आमदार पाटील यांनी सोमवारी होणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेऊन त्यांचा जीवन प्रवास यांनी जाणून घेतला. त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या ३० वर्षांपासून धैर्याने आणि चिकाटीने रिक्षाचालक म्हणून काम करताना दुधाणे यांनी परिस्थितीला खंबीरपणे तोंड दिले. मुलांना शिक्षण दिले, संसाराला आकार, तर दिलाच पण लोकांची सेवा करण्याचे व्रत जपले. रात्री-अपरात्री पेशंट तसेच अडचणीतील लोकांना त्या रिक्षाची सेवा देतात. बऱ्याच लोकांकडे त्यांचा मोबाइल क्रमांक आहे. त्यांचे या सर्वांशी कुटुंबीय नाते निर्माण झाल्याने सर्वजण हक्काने त्यांच्याशी संपर्क करतात. दुधाणे यांनी निवडलेली वेगळी वाट आजही वेगळ्या क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात आमदार पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.
फोटो (०७०३२०२१-कोल-आमदार ऋतुराज पाटील) : कोल्हापुरात रविवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी राज्यातील पहिल्या लायसन्सधारक महिला रिक्षाचालक रेखा दुधाणे यांच्या रिक्षातून फेरफटका मारून त्यांचा जीवनप्रवास जाणून घेतला.