शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु

By भारत चव्हाण | Updated: May 19, 2024 17:17 IST

उपचारासाठी मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरांना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलविण्यात आले आहे.

कोल्हापूर: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांची प्रकृती बिघडल्याने रविवारी सकाळी त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कमी रक्तदाबाचा त्रास सुरु होता. रविवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये तोल जाऊन ते पडले. त्यांच्या हाताला तसेच डोक्याला मार लागल्यानंतर त्यांना तातडीने एक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार कार्यात सक्रिय राहिलेल्या आमदार पी. एन. पाटील यांना निवडणूक झाल्यानंतर कमी रक्तदाबाचा त्रास सुरु झाला होता. दोन दिवसापूर्वी त्यांच्या प्रकृतीबाबत काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये काहीही दोष आढळला नाही. त्यामुळे ते उपचारानंतर घरीच विश्रांती घेत होते. रविवारी सकाळी ते बाथरुममध्ये असताना यांच्या हाताला व डोकीला मार लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरना विशेष विमानाने कोल्हापुरात बोलविण्यात आले आहे.

आमदार पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळताच शाहू छत्रपती, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार ऋतुराज पाटील, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संजय डी. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी रुग्णालयात जाऊन पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  भोगावती तसेच करवीर मतदार संघातील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्त्यांनीही रुग्णालयाकडे धाव घेत विचारपूस केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMLAआमदार