तुडीये भागाला आमदार पाटील यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:25 IST2021-05-08T04:25:56+5:302021-05-08T04:25:56+5:30
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असलेल्या गावातील कोरोना दक्षता कमिट्या एकत्र येऊन त्या-त्या गावातील आरोग्य यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा वाढवाव्यात, कोरोना ...

तुडीये भागाला आमदार पाटील यांची भेट
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असलेल्या गावातील कोरोना दक्षता कमिट्या एकत्र येऊन त्या-त्या गावातील आरोग्य यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणा वाढवाव्यात, कोरोना दक्षता कमिटी व आशा, आरोग्यसेवक शिक्षक यांनी प्रत्येक घरात जाऊन कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडून सध्या जोरात सुरू असलेली कोरोनाची चेन लवकरात लवकर ब्रेक करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
यावेळी जि. प. सदस्य अरुण सुतार, माजी सभापती बडोपंत चिगरे, कोवाडचे उपसरपंच विष्णू आढाव, माजी सरपंच मारुती पाटील, तुडीयेचे कोलिक गावचे सरपंच व कोरोना दक्षता कमिटी, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : तुडीये येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी ग्रामस्थांना सूचना केल्या.
क्रमांक : ०७०५२०२१-गड-१२