पन्हाळ्यातील ठरावधारक सत्तारुढबरोबरच आमदार पाटील यांचा दावा : फुलेवाडीत घेतला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:47+5:302021-04-28T04:25:47+5:30
कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीसोबतच राहण्याचा निर्धार पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांनी मंगळवारी येथे व्यक्त झाला. सत्तारुढ आघाडीचे ...

पन्हाळ्यातील ठरावधारक सत्तारुढबरोबरच आमदार पाटील यांचा दावा : फुलेवाडीत घेतला मेळावा
कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीसोबतच राहण्याचा निर्धार पन्हाळा तालुक्यातील ठरावधारकांनी मंगळवारी येथे व्यक्त झाला. सत्तारुढ आघाडीचे नेते आमदार पी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत फुलेवाडी येथे मेळावा झाला. तालुक्यातील ६१ पैकी ५७ ठरावधारकांनी उपस्थिती लावल्याचा दावा सत्तारुढ गटाने केला आहे. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून पारदर्शी कारभार होत आहे. गोकुळ दूध संघ राज्यात व देशात एक नंबर चांगला चालला असून, नियमानुसार उत्पादकांना उत्पन्नातील ७० टक्के द्यायचे आणि ३० टक्के खर्चाला द्यायचे; पण आम्ही त्यांना ८१ टक्के वाटप करतोय आणि १९ टक्क्यात खर्च भागवतोय. दुधातील फरक ९८ कोटी रुपये आहे. मधल्या काळात तीन - चार महिने संपूर्ण दुधाची पावडर केली. तरीसुद्धा ठेवी असल्यामुळे उत्पादकांना वेळेत बिले देऊ शकलो. आम्ही शेतकऱ्याच्या घामाचा पैसा शेतकऱ्याला देतोय. त्यामुळे राजर्षी शाहू आघाडीला ताकदीने पाठबळ द्यावे. यावेळी शशिकांत आडनाईक, एन.सी.पाटील, शाहू काटकर, सुहास राऊत, भरत मोरे, पी.डी. हंकारे यांची मनोगते झाली.
२७०४२०२१-कोल-पीएन न्यूज
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत पन्हाळा तालुक्यातील ठरावधारक मतदारांचा मेळावा आमदार पी.एन.पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी फुलेवाडी येथे झाला.