शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ यांची भूमिका ही त्यांची ‘अगतिकता’; सहा महिने चौकशीने हैराण

By राजाराम लोंढे | Updated: July 3, 2023 12:55 IST

..त्यामुळे ते पवार यांची साथ सोडतील असे वाटतच नव्हते.

कोल्हापूर : कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करण्यामागे त्यांची अगतिकता आहे. ‘ब्रिक्स’ कंपनी, जिल्हा बँकेच्या मागे गेली सहा महिने ईडीचा ससेमिरा लावला होता. न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी ते कमालीचे हैराण होते.हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत आमदार अशीच संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक व हसन मुश्रीफ यांच्यात संघर्ष उफाळला त्यावेळी पवार यांनी मुश्रीफ यांना साथ व ताकद दिली. एवढ्यावरच पवार थांबले नाहीतर मुश्रीफ यांच्या सारख्या अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याला पाच वेळा आमदार आणि अठरा वर्षे मंत्रिपद दिले. हे खुद्द मुश्रीफ यांनीच जाहीर सभांमधून सांगितले आहे.अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथवेळी ते शरद पवार यांच्यासोबतच ठाम राहिले. ते पवार हे आपले बाप असल्याचे जाहीरपणे सांगत होते. त्यामुळे ते पवार यांची साथ सोडतील, असे वाटतच नव्हते. पवार यांचे पश्चिम महाराष्ट्रातील निष्ठावंत आमदारांमध्ये मुश्रीफ यांचे स्थान वरचे होते. गडहिंग्लज साखर कारखाना त्यांनी ‘ब्रिक्स’ कंपनीस चालवण्यास दिला. या कंपनीसह जिल्हा बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेला कर्जपुरवठा व संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्सच्या मुद्द्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनियमतेबाबत ईडीकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यासह नातेवाइकांच्या घरांवर, जिल्हा बँकेच्या शाखांवर ईडीने छापे टाकले होते.गेल्या सात-आठ महिन्यांपासून मुश्रीफ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावल्याने ते अस्वस्थ होते. त्यांना घेरण्याचे काम भाजपने केेल्याने भाजपसोबत जाण्याखेरीज त्यांच्याकडे काहीच पर्याय राहिला नव्हता. त्यामुळे मुश्रीफ यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची अगतिकताच होती, असे मानले जाते.‘ते’ फोटो आता सन्मानानेकागल मतदारसंघातील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या हसन मुश्रीफ यांच्या जाहिरातीमध्ये शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते. याबाबत, गैरसमज करू नये, असा खुलासा त्यांनी केला होता. मात्र, थोड्याच दिवसात हेच समीकरण उदयास आल्याने आता ते फोटो सन्मानाने लावण्यास हरकत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष