शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: म्हाकवेत येणार शुध्द पाणी, पण आणले कोणी; श्रेयवादाचे राजकारण, निधीच्या रकमेत तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:01 IST

गावात श्रेयवाद उफाळण्याची शक्यता

दत्तात्रय पाटील म्हाकवे : कागल तालुक्यात कोणत्या कारणावरून राजकीय वाद रंगेल याचा नेम नसतो. सध्या, विकास कामांच्या उद्घाटनावरुन वाद सुरू आहेत. म्हाकवे येथील महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. त्यामुळे शुध्द पाण्याच्या म्हाकवेकरांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी नेमकं पाणी कोणी आणलं? यामध्ये श्रेय कोणाचं? याबाबत सुरू असणाऱ्या दावे-प्रतिदाव्यामुळे गावकरीच बुचकळ्यात पडले आहेत.येथील पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल पाचहून अधिक योजना झाल्या. शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. माञ, म्हाकवे येथील पाणी प्रश्नाचे ग्रहण काही सुटत नाही. शासनाने जनजीवन पाणी पुरवठा योजनेतून तब्बल ४ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एचडीपी पाईपसह फिल्टर हाऊस, टाकीही होणार आहे.दरम्यान, पेयजल मधून दहा वर्षापूर्वी झालेली सुमारे दीड कोटीची योजना कार्यरत असून ती केवळ खर्चासाठी तर नव्याने होणाऱ्या योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. माञ, सर्वच गल्लीतून पुन्हा खुदाई होणार असल्याने पुन्हा रस्त्यासाठी निधी आणावा लागणार आहे.चोर....घुसखोरया योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आरोप प्रत्यारोपाच्याही फैरी झडल्या. विकास कामांची चोरी होत असल्याचा आरोप आमदार मुश्रीफांनी केला. तर याला प्रत्युत्तर देत समरजित घाटगेंनी घुसखोर असल्याचा आरोप केला.निधीच्या रकमेतही तफावतबसस्थानकावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर फलक लावले आहेत. एकावर ४ कोटी ८४ लाख तर दुसऱ्या फलकावर ४ कोटी ९४ लाख असा उल्लेख आहे. त्यामुळे त्या दहा लाखांचे काय असा सवाल उपस्थित होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.तालुक्यात अनेक गावात हीच स्थिती..हा निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाला असल्याचे आमदार मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. तर ही केंद्राची योजना असून याच्या उद्घाटनाचा नैतिक अधिकार आम्हालाच असल्याचा दावा समरजित घाटगे यांच्याकडून होत आहे. कागल मतदार संघात अनेक गावांत या योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्यामूळे अनेक गावात श्रेयवाद उफाळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगे