शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 12:37 IST

आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.

भारत चव्हाणसकाळी बातमी कानावर आली आणि धक्काच बसला. आयुष्यभर संघर्ष, संकटांशी लढताना दाखविलेले धैर्य, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश मिळविण्याची महत्त्वाकांक्षा असलेले आमदार चंद्रकांत जाधव गेले हेच मुळात पटत नव्हते. झपझप व्हाॅटस्ॲप ग्रुप चाळले तर सर्वत्रच ते गेल्याची प्राथमिक माहिती मिळत गेली. क्षणभर काहीच सूचत नव्हते. तरीही एक-दोन फोनवर बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले. शांत, निगर्वी, मिभाषी, यशस्वी उद्योजक-राजकारणी झाल्यानंतरही पाय जमिनीवर ठेवून सर्वसामान्यांशी जवळीक असलेले चंद्रकांत जाधव यांचा प्रसन्न चेहरा, त्यांचे गोड शब्द कानावर पडत असल्याचा भास व्हायला लागला.चंद्रकांत ‘अण्णा’ या टोपण नावाने ओळखले जात होते. नशिबाने सर्व गोष्टी त्यांना मिळाल्या; परंतु नशीब घडविण्याचे कसब त्यांच्या हिमतीत होते. आधी फुटबॉल खेळाडू म्हणून ते यशस्वी झाले, नंतर उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला. २०१९ मध्ये अचूक वेळ साधत राजकारणासारख्या नव्या क्षेत्रांत यश मिळविले. त्यांच्या आयुष्यातील पहिल्याच आणि तेही आमदारकीच्या निवडणुकीत उडी घेतली आणि यशस्वीही झाले. अण्णा वृत्तीने प्रचंड कष्टाळू होते. एखादी गोष्ट मनात आली म्हणून त्यांनी कधीच केली नाही. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अभ्यासाअंती ते स्वत:चे मत बनवायचे आणि मगच ती गोष्ट करायची की नाही ठरवीत होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही.सन १९८१ मध्ये तरुणवयातील अण्णांनी वडिलोपार्जित उद्योगात पहिले पाऊल टाकले. त्यांना लेथ मशीनवर काम करण्याचे कसलेही ज्ञान नव्हते; परंतु त्यांनी वडिलांच्या हाताखाली पडेल ती कामे करण्याचा प्रयत्न केला. कारखान्यात कामगार म्हणून काम करीत असतानाच ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊन आपल्या व्यवसायाशी निगडित तांत्रिक शिक्षण पूर्ण केले. त्यातून त्यांच्यात लपलेल्या एक नव्या उद्योजकाची पाळेमुळे रुजली. १९९६ मध्ये वडील पंडितराव यांचे निधन झाले. सगळी जबाबदारी अण्णांच्या खांद्यावर आली. ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे सांभाळलीच नाही तर उद्योगाला भरभराटी प्राप्त करून दिली. जाधव इंडस्ट्रीजला संपूर्ण देशभरात नावलौकिक प्राप्त करून दिला.आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. शहरातील अनेक प्रश्नांचा त्यांनी अभ्यास केला. एकेक प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले होते. व्यापारी, उद्योजकांच्या जकात, एलबीटीविरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. नियमित विमान सेवा, रस्ते, आरोग्याच्या समस्या, पाणीपुरवठ्यातील सुधारणा याविषयी त्यांनी काम सुरू केले होते. प्रत्येक आठवड्याला ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करीत होते. त्यामागे जनतेच्या समस्या सुटाव्यात, त्यांची कामे व्हावीत हाच हेतू होता.समाजातील उच्चभ्रू लोकांशी त्यांचे जसे संबंध होते तसेच गोरगरीब, उपेक्षित घटकांशीसुद्धा त्यांची नाळ जोडली गेली होती. दातृत्व हा त्यांचा स्थायिभाव होता. मोठा उद्योजक, आमदार, घरात दोन नगरसेवक, अनेक मोठ्या संस्थांशी संबंध असूनही त्यांनी गर्व कधी बाळगला नाही. समाजातील सर्व घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कोणीही त्यांना सहजपणे भेटत होते. दोन वेळा आलेला महापूर आणि कोरोनासारख्या महामारीवेळी अण्णांनी सर्वसामान्यांसाठी अन्नधान्याची किट, औषधींचे वाटप केले. त्यांच्यासाठी वैद्यकीय शिबिरे घेतली. कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधी, तर त्यांनी घराघरात जाऊन वाटली. लॉकडाऊन असताना ते स्वत: रस्त्यावर उतरून लोकांना मार्गदर्शन करीत होते. जनतेचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी प्रयत्नशील होते.दुर्दैवाने त्यांनाच कोरोना झाला. त्यातूनही ते उठले. परत कामाला लागले होते. दुर्दैवाने अन्ननलिकेचे इन्फेक्शन झाले. त्यातून ते बाहेर आले नाहीत. जीवनात कधीही हार न माणणाऱ्या अण्णांना या आजारात मात्र हार मानावी लागली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणMLAआमदारcongressकाँग्रेस