आमदार आबिटकर यांनी ‘गोकुळ’च्या परिवर्तन लाटेत सहभागी व्हावे : डोंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST2020-12-29T04:23:20+5:302020-12-29T04:23:20+5:30

तारळे खुर्द येथील दूध संस्था नूतन इमारत उद्‌घाटन व शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ...

MLA Abitkar should participate in the transformation wave of 'Gokul': Dongle | आमदार आबिटकर यांनी ‘गोकुळ’च्या परिवर्तन लाटेत सहभागी व्हावे : डोंगळे

आमदार आबिटकर यांनी ‘गोकुळ’च्या परिवर्तन लाटेत सहभागी व्हावे : डोंगळे

तारळे खुर्द येथील दूध संस्था नूतन इमारत उद्‌घाटन व शेतकरी संघाचे माजी संचालक मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डोंगळे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांनी गावच्या विकासासाठी दहा लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील यांनी मानसिंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना योग्यवेळी संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष विलास गुरव यांनी केले, तर प्रास्ताविक संगमानसिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमास संग्राम पाटील, दीपक पाटील, कांबळवाडी, धनाजी सरावणे, पांडुरंग किल्लेदार, अशोक पाटील, संस्थेचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष नेताजी चौगले यांनी आभार मानले.

Web Title: MLA Abitkar should participate in the transformation wave of 'Gokul': Dongle