शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

‘एमजेपी’ची ९६ कोटी थकबाकी बोगस

By admin | Updated: February 10, 2015 00:29 IST

महापालिका सर्वसाधारण सभेत ‘जीवन प्राधिकरण’विरोधात संताप

कोल्हापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) ९६ कोटींच्या थकबाकीसाठी महापालिकेची बँक खाती गोठविण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे. ‘एमजेपी’ला धडा शिकविण्यासाठी सर्व नगरसेवक मोर्चाने जाऊन ‘एमजेपी’चे कार्यालय बंद पाडतील, असा इशारा सोमवारी झालेल्या सभेत राजेश लाटकर यांनी दिला. त्यास सर्व सभागृहाने बाके वाजवून पाठिंबा दिला. जीवन प्राधिकरणच्या चुकीमुळेच शिंगणापूरची गळकी योजना शहरवासीयांच्या माथी मारली आहे. ३१ कोटींच्या योजनेसाठी ३२ कोटींची रक्कम अदा केली आहे. गळतीसाठीही १५ कोटी खर्च केलेत तरीही प्राधिकरण कुरघोड्या करत आहे. त्यांना धडा शिक विण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. दरम्यान, याबाबत एमजेपीने दाखल केलेल्या तक्रारीवरून करवीर तहसीलदारांनी दिलेल्या आदेशास न्यायालयाने स्थगिती दिल्याचे महापालिका सूत्रांनी सांगितले.शिंगणापूरच्या गळक्या योजनेतील नसलेल्या थकबाकीसाठी जीवन प्राधिकरण महापालिकेस कायदेशीर नोटिसा बजावत असतानाही प्रशासन सभागृहापासून माहिती लपवत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती सभागृहास समजली पाहिजे, अशी मागणी प्रा. जयंत पाटील व भूपाल शेटे यांनी केली. आजपर्यंत ३२ कोटी रुपये दिल्याचे लेखाधिकारी संजय सरनाईक यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी योजनेचे हस्तांतरण करताना योग्य काळजी न घेता महापालिकेचे नुकसान केले. एक रुपयाही एमजीपीला सभागृहाच्या परवानगीशिवाय देऊ नये, असे भूपाल शेटे यांनी ठणकावून सांगितले. सभागृहाने ही मागणी एकमुखाने मान्य केलीदरम्यान, व्याज व चक्रवाढ व्याजासह ९६ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची सर्व बँक खाती गोठविण्याची मागणी एमजेपीने केली होती. आज येथील दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी झाली. न्यायालयाने या मागणीस स्थगिती देत महापालिकेला म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे.रंकाळ्यासाठी तत्काळ अल्प निविदा काढणारकोल्हापूर : रंकाळ्याच्या पश्चिम बाजूची संपूर्ण ९५ मीटरची संरक्षक भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणामुळेही रंकाळ्याला अवकळा आली आहे. याउलट प्रशासन थातूर-मातूर उत्तर देण्यात समाधान मानत आहे, अशा शब्दांत सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. ८८ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार आहे, अल्प निविदा काढून आठ दिवसांत कामास सुरुवात करू, असे आश्वासन आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. पावसाळ्यापूर्वी काम न केल्यास सर्व संरक्षक भिंत कोसळून शेजारील घरात पाणी जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन काही करणार आहे का? असा सवाल प्रा. जयंत पाटील यांनी उपस्थित केला. रंकाळ्याच्या पश्चिमेकडे १६ ते १४ फूट उंच व दोन फूट रुंदीची ही भिंत १९७४ मध्ये बांधण्यात आली. संपूर्ण भिंतच नव्याने बांधण्याची गरज आहे. राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही पैसे उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.त्यानंतर एकच गोंधळ सुरू झाला. कितीवेळा तीच ती उत्तरे देणार, थातूरमातूर उत्तरे चालणार नाहीत. जिल्हा नियोजन मंडळातून काही रक्कम व महापालिकेच्या उत्पन्नातून काही रक्कम उपलब्ध करून त्वरित काम सुरू करा, अशी सूचना सभागृहाने केली. नगरसेवकांचा रोष पाहून आयुक्त पी. शिवशंकर यांनी अल्प निविदा काढू त्वरित काम सुरू होण्यासाठी लक्ष देण्याचे आश्वासन दिले. रंकाळ्यातील बोटिंगसाठी ४५ लाख रुपयांचा निधी पडून आहे. मात्र, गेली चार वर्षे ठेकेदाराने बोट खरेदी केलेली नाही. याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली.उपसूचनांवरून जुंपलीआयटी पार्क पुन्हा रखडला : शहरवासीयांवर करांचा बोजा नाहीकोल्हापूर : टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटसाठी आरक्षित जागेतील काही हिस्सा आय. टी. पार्कसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत पुन्हा प्रलंबित ठेवण्यात आला. दरम्यान, अनेक महत्त्वाच्या ठरावांस उपसूचना देताना सभागृहास अंधारात ठेवले जाते. सभागृहासमोर उपसूचनेचे वाचन होऊन मंजुरी करावी, यावरून काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्य आघाडीच्या नगरसेवकांत जोरदार ‘वाक्युद्ध’ पेटले. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.टेंबलाईवाडी येथील आरक्षणासह इतर सर्व उपसूचनांचे सभागृहासमोर वाचन झाले पाहिजे, असा आग्रह प्रकाश नाईकनवरे यांनी धरला. त्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे यांनी या आरक्षित जागेत असलेल्या लहान घरांना आरक्षणातून वगळण्याची उपसूचना दिली. संपूर्ण जागाच वाणिज्य कारणासाठी आरक्षित करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. टीडीआर दिला असल्याने असे करण्यास भूपाल शेटे यांनी विरोध केला.टिंबर मार्केटसाठी जागा आरक्षित राहिलीच पाहिजे, असा आग्रह शारंगधर देशमुख यांनी केला. टीडीआर, उपसूचना कधी द्यायची, आताच का, असा आग्रह आदींवरून काँग्रेस व राष्ट्रवादी-जनसुराज्य नगरसेवकांत वादावादी झाली. शेवटी आयटी पार्कसाठी जागा आरक्षणाचा निर्णय पुढील बैठकीत घेण्याचे ठरले.प्रसंगी मोर्चा काढून कार्यालय बंद पाडण्याचा नगरसेवकांचा इशारामहापालिकेची बॅँक खाती गोठविण्याच्या आदेशास न्यायालयाची स्थगितीउद्योगांना दिलासाशहरात घरगुती व व्यापारी अशा दोनप्रकारेच घरफाळ्याची आकारणी केली जाते. उद्योगांसाठी वेगळी आकारणी होत नाही. परिणामी शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर आदी उद्योगांकडून रेडिरेकनरच्या तीनपट आकारणी केली जाते. ही आकारणी दीडपट करण्याची उपसूचना लाटकर यांनी मांडली. ती सभागृहाने मंजूर केली.नगरसेवकांनी कोणताही रस्ता अडविलेला नाही, नगरोत्थानमधील रखडलेली कामे निव्वळ काही खंडणीबहाद्दर कार्यकर्ते व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळेच रखडल्याचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडून वदवून घेतले. रस्त्याच्या कामावरून विरोधी पक्षनेता मुरलीधर जाधव व अतिरिक्त आयुक्तांच्यात खडाजंगी झाली. वादग्रस्त राजाराम कारखान्यावरील बगीचा आरक्षणाच्या ठरावावर चर्चाच झाली नाही.केएमटी वाहकाविरोधात नगरसेविकांचा संतापकोल्हापूर : केएमटीच्या शिये-मोहिते कॉलनी या बसच्या वाहकाने तिकिटाचे पैसे परत देण्याच्या कारणावरून एका महाविद्यालयीन युवतीशी गैरवर्तन केले. याचे पडसाद सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटले. या उद्दाम वाहकास समक्ष बोलावून नगरसेविकांनी चांगलेच धारेवर धरले. या वाहकाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे केएमटीचे प्रभारी व्यवस्थापक संजय भोसले यांनी आश्वासन दिले.याबाबत माहिती अशी की, सोमवारी प्रवास करणाऱ्या मोहिते कॉलनीतील एक विद्यार्थिनीने या संबंधित वाहकाकडे तिकिटाचे राहिलेले दोन रूपये परत मागितले असता त्याने हुज्जत घातली तसेच या विद्यार्थिनीला नंगिवली चौकातच एक स्टॉप अगोदर उरतरण्याचा तगादा लावला. यावेळी तिचा हातही धरला, अशी तक्रार संबंधित विद्यार्थिनीने केली. त्यामुळे वाहकास तत्काळ कारवाई करण्याची मागणी आजच्या सभेत नगरसेविकांनी केली.