गोकुळ शिरगावमध्ये हद्दवाढीच्या चर्चा सत्रात संमिश्र मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST2021-09-13T04:22:33+5:302021-09-13T04:22:33+5:30
गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गोकुळ शिरगावचे सरपंच ...

गोकुळ शिरगावमध्ये हद्दवाढीच्या चर्चा सत्रात संमिश्र मते
गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी गोकुळ शिरगावचे सरपंच महादेव पाटील होते. चर्चासत्रासाठी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे निमंत्रक राजू माने, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, कळंबा, पिरवाडी आणि उंचगाव या गावातील लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
चर्चासत्रात पिरवाडी, उंचगाव आणि कळंबा या गावच्या सरपंचांनी उपस्थित राहत स्पष्ट हद्दवाढीला विरोध दर्शविला. उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव येथील प्रतिनिधींनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी हद्दवाढीसंदर्भातील अठरा गावांपैकी पाच गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. विरोधी कृती समितीचे कार्यकर्ते नारायण पोवार यांनी हद्दवाढ व्हावी यासाठी स्पष्ट पाठिंबा दिला. पाठिंबा व्यक्त करताना विकासाच्या मुद्द्यावर आता सर्व लोकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी गोकुळ शिरगावचे सरपंच महादेव पाटील यांनी गावसभेमध्ये गावकऱ्यांनी ठराव करण्याचे आव्हान केले तसेच लोकमतानुसार निर्णय घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी वाशीचे बी. ए. पाटील, पिरवाडीचे कृष्णात धोत्रे, शियेचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णात चौगुले, कळंबा ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, उचगावचे दीपक रेडेकर, शिये येथील बाबासाहेब पोवार, उचगाव येथील कावजी कदम, मधुकर चव्हाण, अनिल माने आदींनी हद्दवाढ विरोधी मते व्यक्त केली.
यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळ शिरगाव ग्रा, पं. सदस्य शामराव पाटील, संतोष कागले, सातापा कांबळे, टी. के. पाटील, बबन शिंदे, शंकरराव पाटील,आदींसह उंचगाव, उजळाईवाडी, पिरवाडी, शिये, कळंबा, आदी गावांतील नागरिक उपस्थित होते.
आभार उचगावचे अनिल शिंदे यांनी मानले.
:
हद्दवाढीबाबत ग्रामीण जनतेचे प्रबोधन करावे. हद्दवाढ टप्याटप्याने झाली पाहिजे. याची दक्षता महानगरपालिकेने घेतली पाहिजे.
-
राजू माने, हद्दवाढ विरोधी कृती समिती निमंत्रक
प्रतिक्रिया
कोल्हापूर शहर हद्दवाढ विरोधी कृती समितीने उर्वरित गावांच्या बैठक बोलावून घ्याव्यात.
यामध्ये त्यांचे मत नोंदवावे. शहराच्या सुविधांना प्राधान्य देऊन शहर विकसित करून मॉडेल उभे करून मगच हद्दवाढ मागणी करावी.
बाजीराव पाटील (सामाजिक कार्यकर्ते,
अभ्यासक, गोकुळ शिरगाव)
फोटो कॅप्शन
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतच्या सभागृहात हद्दवाढीबाबत चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना नारायण पोवार, सोबत गोकुळ शिरगावचे सरपंच महादेव पाटील, राजू माने आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो विजय कदम,कणेरी.