शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Kolhapur: वस्त्रोद्योगाला वीज सवलत म्हणजे लबाडाघरचं आवतन, वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:32 IST

प्रत्यक्षात वीज बिलात अंमलबजावणी अपेक्षित

अतुल आंबीइचलकरंजी : यंत्रमागासाठी वीजदरात जाहीर असलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णयावर वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यंत्रमागधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वीही शासनाने हा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. प्रत्यक्षात वीजबिलातून रक्कम कमी झाल्यानंतरच समाधान व्यक्त होणार आहे. ऑनलाइन नोंदणीच्या किचकट अटींमध्ये पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवली जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील सभेत यंत्रमानधारकांना वीजबिलात सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत २७ अश्वशक्तीखालील वीज वापर असलेल्या यंत्रमाग व्यावसायिकांना प्रतियुनिटला १ रुपया व २७ अश्वशक्तीवरील परंतु २०१ अश्वशक्तीपर्यंत वीज वापरणाऱ्यांना ७५ पैसे युनिट वीज दर सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली सहा-सात वर्षांपासून प्रलंबित मागणीला निवडणुकीच्या तोंडावर का होईना मंजुरी मिळाल्याने यंत्रमाग व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

श्रेयवाद रंगलाया निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी आपणच कसे प्रयत्न केले, याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात श्रेयवाद रंगला. दोघांनीही याबाबतचा संदेश सोशल मीडियावर फिरवले. प्रसिद्धी पत्रकाद्वारेही सर्वांना माहिती दिली.

देशातील २० लाख यंत्रमागापैकी तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी हा निर्णय आवश्यकच आहे. पूर्वीनुभव पाहता ऑनलाइन नोंदणीच्या किचकट अटींच्या माध्यमातून पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवीली जाऊ नये, अशी अपेक्षा. - किरण तारळेकर, अध्यक्ष,विटा यंत्रमाग संघसवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, तरच यंत्रमागधारकांना थोडा दिलासा मिळेल ; अन्यथा यंत्रमागधारकांकडून काढून घेतले आणि त्या रकमेचे वितरण केले, असा अन्याय होईल. वस्त्रोद्योग अभ्यास समितीने दिलेला अहवाल लागू केला तरच या व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. - विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटनामागील वस्त्रोद्योग धोरणामध्ये कोणतीही योजना व सवलती वस्त्रोद्योगास मिळाल्या नाहीत. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाला वगळले. आताही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वीजबिलाची सवलत म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे. - विकास चौगुले, अध्यक्ष, स्वाभिमानी यंत्रमाधारक संघटनामंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यावर कोणताही विषय नसताना आपण केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्त्रोद्योगाला बूस्टर देण्याचे काम केले आहे. यामुळे अडचणीतील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळेल. - रवींद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुखवीजबिलात सवलत मिळावी, अशी भावना यंत्रमागधारकांची होती. सर्व पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. त्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले. वीजबिल सवलतीचा फायदा यंत्रमागधारकांना उद्योग-व्यवसायवाढीमध्ये मिळाला पाहिजे, याची दक्षता सर्वांनाच घ्यावी लागेल. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTextile Industryवस्त्रोद्योगelectricityवीज