धरणग्रस्तांचे चुकले... सरकारचे तरी बरोबर आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:20 IST2020-12-09T04:20:24+5:302020-12-09T04:20:24+5:30

गडहिंग्लज : प्रकल्प होता २९ कोटींचा; तो २४० कोटींवर गेला. २० वर्षांत धरण झाले नाही. पुनर्वसनासाठी सातत्याने संघर्ष ...

Mistakes of dam victims ... is the government right? | धरणग्रस्तांचे चुकले... सरकारचे तरी बरोबर आहे का?

धरणग्रस्तांचे चुकले... सरकारचे तरी बरोबर आहे का?

गडहिंग्लज : प्रकल्प होता २९ कोटींचा; तो २४० कोटींवर गेला. २० वर्षांत धरण झाले नाही. पुनर्वसनासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. थोबाडीत मारून घेऊन आत्मक्लेश करणाऱ्या धरणग्रस्तांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले, त्यांचे जरा चुकले. मग सरकारचे तरी बरोबर आहे का? असा सवाल ज्येष्ठ नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी मंगळवारी विचारला.

सोमवारी (दि. ७) आंबेओहोळ प्रकल्पस्थळी आंदोलन करणाऱ्या धरणग्रस्तांविरुद्ध पाटबंधारे अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले आहेत. अधिकाऱ्याला जिवे मारण्याचा व मोबाईलची चोरी हे दोन्ही गुन्हे खोटे आहेत. त्यामुळे ते मागे घ्यावेत, यासाठी आपण प्रांतकचेरीसमोर आज, बुधवारी उपोषणास बसणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, गडहिंग्लज विभागातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी धरणे बांधावीत यासाठी आणि धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांचे योग्य पुनर्वसन करावे म्हणूनही आपण लढलो. हक्कासाठी लढण्याचा धरणग्रस्तांना अधिकार आहे. त्यांना गुन्हेगार ठरवू नये.

------------------------------

* उचंगीचे काय झाले?

सन २०१८ मध्ये गडहिंग्लजला झालेल्या पाणी परिषदेत उचंगीचे काम पूर्ण करून त्याचवर्षी जूनमध्ये पाणी अडविण्याची घोषणा तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती; परंतु, ते झाले नाही. त्या धरणाचे कामदेखील आता धरणग्रस्तांनी बंद पाडले आहे. मंत्री हे सरकारचे प्रतिनिधी असतात. त्यांनी खोटे बोलले तर चालते का ? असा प्रश्नही शिंदे यांनी विचारला आहे.

......................................

* ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आंबेओहोळप्रश्नी ११ डिसेंबरला बैठक ठरली आहे. तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आपण पाटबंधारे अधिकाऱ्यांना सांगितले होते. तरीदेखील त्यांनी काम सुरू केले; म्हणूनच हा प्रकार घडला. त्याला तेच जबाबदार आहेत, असेही शिंदे म्हणाले.

..............................

Web Title: Mistakes of dam victims ... is the government right?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.