बेपत्ता वृध्दाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:06+5:302021-06-18T04:18:06+5:30
कोल्हापूर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले दत्तात्रय शंकरराव साळोखे वय ६६ रा. बुवा ...

बेपत्ता वृध्दाचा बुडून मृत्यू
कोल्हापूर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले दत्तात्रय शंकरराव साळोखे वय ६६ रा. बुवा चौक यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी क्रशर चौकातील खणीमध्ये आढळून आला. ते शिवाजी पेठेतून बेपत्ता झाले होते.
साळोखे हे बुधवारी सकाळी मित्राकडे जातो असे सांगून बाहेर पडले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. तरीही ते न सापडल्याने जुना राजवाडा पोलिसात ते बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान गुरुवारी सायंकाळी खणीमध्ये त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पोलीस कॉन्स्टेबल सागर डोंगरे, हणमंत कुंभार यांनी प्राथमिक तपास केला.