मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक मंगळवारी बंद

By Admin | Updated: January 4, 2016 00:44 IST2016-01-03T23:34:34+5:302016-01-04T00:44:03+5:30

मंगळवारी सकाळी कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मिरजेतूनच सुटणार आहे. मुंबईतून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस मिरजेपर्यंत धावणार आहे.

Miraj-Kolhapur Railway is closed on Tuesday | मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक मंगळवारी बंद

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक मंगळवारी बंद

मिरज : जयसिंगपूरजवळ रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे सह्याद्री एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेपर्यंत धावणार आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या पॅसेंजर एक्स्प्रेस मिरजेतून सुटणार आहेत.जयसिंगपूर ते हातकणंगलेदरम्यान रेल्वे गेट क्रमांक १४ येथील रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी मंगळवारी मध्यरात्री १ ते सकाळी सात वाजेपर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मेगा ब्लॉकमुळे सोमवारी रात्री सांगली-कोल्हापूर पॅसेंजर कोल्हापूरला जाणार नाही. मंगळवारी सकाळी कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मिरजेतूनच सुटणार आहे. मुंबईतून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस मिरजेपर्यंत धावणार आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत अर्धा तास थांबून कोल्हापूरला रवाना होणार आहे. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेतच थांबणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद ही गाडी मिरजेतूनच हैदराबादला जाणार आहे. सकाळच्या एक्स्प्रेस व पॅसेंजर मिरजेतून सुटणार असल्याने कोल्हापुरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Miraj-Kolhapur Railway is closed on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.