शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मिरज : मिरजेतील सावकारावर सांगलीत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 11:56 IST

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे मिळकतीवर बोजा : दोन कोटीची मागणी-चोरट्यांनी चोरी करून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू

 

मिरज : मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर तंदुरी ढाब्याच्या पिछाडीस महंमद खान यांचा बंगला आहे. शिरढोण येथे ढाब्याचा व्यवसाय असल्याने खान कुटुंबीय तेथेच वास्तव्यास आहे. गुरूवारी मध्यरात्री खान यांच्या बंद बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व कपाटे फोडून सोन्याचे गंठण, चेन, अंगठ्या, कर्णफुले असे दहा तोळे दागिने, दीड लाख रोख रक्कम चोरून नेण्यात आली. 

शेजारी राहणारे खान यांचे भाऊ अहमद खान यांना सकाळी बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. बेडरूमधील कपाट कटावणीने उचकटून आतील दागिने लंपास केले. चोरट्यांनी बंगल्यातील बेडरूमसह आठ खोल्यांची कुलपे तोडली. बेडरूममधील लोखंडी तिजोरी व प्रत्येक खोलीतील कपाटे फोडून सर्व साहित्य विस्कटून टाकले. चोरीच्या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह  पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी श्वानपथक आणून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. बंगल्याजवळ असलेल्या ओढ्यातून पाटील मळ्यापर्यंत श्वानाने माग काढला. चोरट्यांनी चोरी करून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय आहे. 

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द महंमद खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.बेन्टेक्सचे दागिनेही नेलेचोरट्यांनी सोने व रोख रक्कम असलेली तिजोरी गादीवर ठेवून फोडली. घटनास्थळी चाकू व कटावणी चोरटे सोडून गेले. सोन्याच्या दागिन्यांसोबत बेंटेक्सचे दागिनेही चोरटे सोबत घेऊन गेले. तीन ते चार चोरट्यांनी चोरीचे कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

टॅग्स :MONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली