अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस चोप

By Admin | Updated: November 1, 2014 00:42 IST2014-11-01T00:36:22+5:302014-11-01T00:42:18+5:30

इचलकरंजीतील घटना : नागरिकांतून संताप व्यक्त

Minor girl raped; Chop chopped off | अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस चोप

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस चोप

इचलकरंजी : येथील घोडकेनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आज, शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच संशयित आरोपीला नागरिकांनी बेदम चोप देत त्याचे मुंडण केले व शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. सादिक इमामहुसेन लाडेखान (वय ३५, रा. घोडकेनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित सादिक हा विवाहित आहे. दुसऱ्या पत्नीबरोबर तो घोडकेनगरमध्ये राहतो. त्याचे संत मळ्यामध्येही भाड्याचे घर आहे. या घराशेजारी इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला त्याने ‘माझी बायको माहेरी गेली आहे, त्यामुळे तू आमच्या घोडकेनगरमधील घरी भांडी घासण्यासाठी ये’, असे सांगून सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडित मुलगी त्याच्या घरी गेल्यानंतर त्याने घराच्या दाराला आतून कडी लावली आणि ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, या प्रकाराचा संशय परिसरातील तरुणांना आला होता. मुलगी घरातून बाहेर आल्यानंतर तिला अडवून विचारले असता, तिने घडला प्रकार सांगितला. संतप्त जमावाने सादिक याला चोप दिला. या प्रकरणाची माहिती शिवाजीनगर पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सादिक याला ताब्यात घेतले. त्यानंतर पीडित मुलगी, तिचे वडील व भाऊ यांना बोलावून घेऊन तक्रार दाखल करून घेतली.

Web Title: Minor girl raped; Chop chopped off