चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:44 IST2021-03-13T04:44:24+5:302021-03-13T04:44:24+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळोखे मळ्याकडे सायकलवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलास चारचाकीने समोरून धडक दिली. त्यात तो जखमी ...

चारचाकीच्या धडकेत अल्पवयीन मुलगा जखमी
कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साळोखे मळ्याकडे सायकलवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलास चारचाकीने समोरून धडक दिली. त्यात तो जखमी झालेल्या मुलास उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करताच पसार झालेल्या चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. विराट विशाल कदम असे अल्पवयीन जखमीचे नाव आहे. संशयित तेजस गंगाराम कात्रट (वय २१, रा. भगवा चौक, विचारेमाळ) असे चारचाकीचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी (दि.७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विराट साळोखे मळ्याकडील घरी सायकलवरून जात होता. या दरम्यान समोरून आलेल्या चारचाकीने त्यास बेदरकारपणे वाहन चालवत धडक दिली. त्यात विराट जखमी झाला. त्याला त्याच अवस्थेत सोडून चारचाकी चालकाने तेथून काढता पाय घेतला. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संशयित चारचाकीसह चालकास शोधून काढले. याप्रकरणी फिर्याद पोलीस हवालदार अनिल चव्हाण यांनी दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झाला.