आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी अडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:22 IST2021-01-18T04:22:57+5:302021-01-18T04:22:57+5:30

जयसिंगपूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ...

Minister of State for Health Yadravkar was stopped by Karnataka Police | आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी अडविले

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी अडविले

जयसिंगपूर : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला निघालेल्या आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळी टोलनाक्यावर रविवारी अडविले. यावेळी मंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

पोलिसांच्या या कारवाईविरोधात मंत्री यड्रावकर यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणबाजी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आरोग्यमंत्री यड्रावकर बेळगावकडे निघाले होते. यावेळी रविवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांकडून मंत्री यड्रावकर यांचा ताफा अडविण्यात आला. राज्यमंत्री यड्रावकर आणि कर्नाटक पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई नक्कीच जिंकू आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात येईल, असा विश्वास आम्हाला वाटतो. आम्ही हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले.

------------------

चौकट -

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध

राज्यघटनेनुसार देशाच्या कोणत्याही भागात जाण्याचा सामान्य नागरिकांचा हक्क आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बेळगावात येत असताना तो हक्क नाकारला जात असल्याने आम्ही कर्नाटक पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करतो.

-डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

फोटो - १७०१२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - कर्नाटकातील कोगनोळी टोलनाक्यावर रविवारी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी अडविले.

Web Title: Minister of State for Health Yadravkar was stopped by Karnataka Police