गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची गाडी अडविली
By Admin | Updated: February 16, 2015 23:26 IST2015-02-16T23:23:01+5:302015-02-16T23:26:19+5:30
गाडी अडवून गाडीसमोर सर्वजण झोपले. काहींनी गाडीवर लाथा मारल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची गाडी अडविली
गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची पोलीस ताफ्यातील चारचाकी गाडी गोविंद पानसरेप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी शास्त्रीनगर येथील खासगी रुग्णालयासमोर अडविली. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल फेकले. त्यामुळे वातावरण तापले. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटवून त्यांची गाडी बाहेर काढली. शास्त्रीनगरातील खासगी रुग्णालयात असलेल्या गोविंद पानसरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास राम शिंदे आले होते.
दुसऱ्या प्रवेशद्वारातून असंख्य पानसरेप्रेमी बाहेर आले. त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांविरोधात घोषणाबाजी करत शिंदे यांची गाडी अडवून गाडीसमोर सर्वजण झोपले. काहींनी गाडीवर लाथा मारल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून हलविण्याचा प्रयत्न केला.तरीही जमाव, कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यावेळी जमावातील एकाने गाडीच्या दिशेने चप्पल फेकले. शेवटी पोलिसांनी लाठीमार करत प्रत्येक कार्यकर्त्याला बाहेर काढले .