कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व आपली मैत्री कायम राहायची असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे लागेल, असा त्यांना खासगीत सल्ला दिला असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आज, शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मंत्री मुश्रीफ म्हणाले, लोकसभा, विधानसभेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती ताकदीने लढणार आहे. सहकाराच्या पातळीवर संदर्भ वेगळे असू शकतात. शेवटी मुख्यमंत्रीच सर्वश्रेष्ठराष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमधील सहभाग व खातेवाटपावरुन शिवसेनेचे आमदार नाराज आहेत, याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, हा भाजप व शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मंत्री पदाची प्रत्येकाला अपेक्षा असते, सगळ्यांनाच मिळते असे नाही. कोणाकडे कोणते खाते गेले तरी मुख्यमंत्री हे सर्वश्रेष्ठ असतात, त्यामुळे कोणी काळजी करण्याची गरज नाही.कोल्हापूरच्या प्रश्नांना चालना देऊसर्किट बेंच, हद्दवाढ, अंबाबाई तीर्थक्षेत्र, कोल्हापूर शहरातील रस्त्यांसह इतर प्रलंबित प्रश्नांना चालना देणार आहे. महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त नाही, हे चुकीचे असून दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मैत्री कायम राहायची असेल तर.., मंत्री हसन मुश्रीफांची काँग्रेसचे नेते सतेज पाटीलांना खुली ऑफर
By राजाराम लोंढे | Updated: July 14, 2023 16:44 IST