शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

Kolhapur Politics: संस्थेला मदत पाहिजे तर महायुतीत या, काँग्रेसच्या राहुल पाटील यांना ऑफर

By राजाराम लोंढे | Updated: March 24, 2025 11:47 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील ‘भोगावती’ साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील ‘भोगावती’ साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारचा आर्थिक डोस महत्त्वाचा असून आगामी पाच वर्षात सत्तेच्या टॉनिकाशिवाय गटाची ताकद वाढवणे अशक्य असल्याने दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी महायुतीसोबत जावे, यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढत आहे. आठवड्यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसोबत येण्याची ऑफर दिल्याने या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.पाच वर्षाचा अपवाद वगळता ‘भोगावती’ कारखान्यावर दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची कायम सत्ता आहे. सध्या कारखाना आर्थिक अडचणीत आहे, साधारणता १२५ कोटीची देणी आहेत. त्यामुळे शासनाच्या मदतीची गरज आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘भोगावती’ला मदत केली आहे. आठवड्यापूर्वी राहुल पाटील, ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेतली. कारखान्याला अर्थसहाय्य करण्याची मागणी केली. पण, महायुतीमध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिली. त्यानंतर श्रीपतरावदादा बँकेतही प्रमुख चौघांची बैठक झाली. ‘भोगावती’ची अडचण, पाच वर्षे सत्तेविना गटाची ताकद वाढणार का? यासह इतर गोष्टींवर चर्चा झाली. एकदम निर्णय घेण्यापेक्षा प्रमुखांशी चर्चा करून राजकीय दिशा ठरवण्यावर शिक्कामोर्तब झाले. या आठवड्यात बैठक होणार होती, पण उद्योगपती धीरज पाटील यांचे अपघाती निधन झाल्याने बैठक होऊ शकली नाही. भाजपने ‘भोगावती’ला आर्थिक मदत व विधानपरिषदेवर संधी अशी ऑफर दिल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीपेक्षा भाजपसोबतच जावे, असाही काहींचा मतप्रवाह आहे.मदत पाहिजे तर महायुतीत यासाखर कारखाने असो किंवा कोणतीही सहकारी संस्थेला शासनाकडून आर्थिक मदत हवी असेल तर महायुतीतील तीन पैकी कोणत्याही पक्षात या. त्याशिवाय मदत न करण्याचा निर्णय तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.निर्णय काँग्रेसनिष्ठांना पचनी पडणार का?दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा सहा पैकी चार विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी त्यांनी वैचारिक भूमिका बदलली नाही. त्यामुळे ‘राहुल’ यांचा पक्षांतराचा निर्णय काँग्रेसनिष्ठांना पचनी पडणार का? त्यांच्यासोबत सगळेच पदाधिकारी येणार का? याबाबत साशंकता आहे.भाजपची अशीही व्यूहरचनाराष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धवसेनेपेक्षा काँग्रेसचे नेते पक्षात घेण्याकडे भाजपचा जास्त कल आहे. काँग्रेसमध्ये जनाधार असलेले, अनेक वर्षे निष्ठावान असलेले नेते फोडून पक्षात घ्यायचे व २०२९ मध्ये स्वबळावर विधानसभा निवडणुकीला सामारे जायचे, अशी पक्षाची व्यूहरचना असल्याचे सूत्रांकडून समजते.

एक एप्रिलला कोणी तरी माझे एप्रिल फूल करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. मी काँग्रेसमध्येच आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये - राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkarvir-acकरवीरHasan Mushrifहसन मुश्रीफMahayutiमहायुतीcongressकाँग्रेस