शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
4
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मुश्रीफ-महाडिकांची बुलेटस्वारी, कोल्हापुरात रंगली चर्चा भारी -video

By समीर देशपांडे | Published: December 25, 2023 4:07 PM

कोल्हापूर : एकदा का राजकीय संदर्भ बदलले की मग कोण कोणाच्या गाडीवर डबलसीट बसेल हे सांगता येत नाही. याचे ...

कोल्हापूर : एकदा का राजकीय संदर्भ बदलले की मग कोण कोणाच्या गाडीवर डबलसीट बसेल हे सांगता येत नाही. याचे प्रत्यंतर सोमवारी कोल्हापूरमध्ये आले. खासदार धनंजय महाडिक यांनी बुलेटला किक मारली आणि त्यांच्या पाठीमागे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांड ठोकली आणि हे हल्ली न दिसलेले दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्यावतीने खासदार करण्यात हसन मुश्रीफ यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे महाडिक कधीही मुश्रीफ समोर दिसले की त्यांना वाकून नमस्कार करतात. मधल्या काळात राष्ट्रवादीत असूनही महाडिक यांचा पराभव झाला आणि सतेज पाटील यांन ‘आमचं ठरलंय’ म्हणत संजय मंडलिक यांना निवडून आणले. नंतर महाडिक भाजपमध्ये गेले आणि मुश्रीफ हे राजकीयदृष्ट्या त्यांचे विरोधक बनले. परंतू तरीही मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात फारसे कधी वाकडे आले नाही.आता तर मुश्रीफ हे अजित पवारांसोबत महायुतीत येवून कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्याने साहजिकच हे या दोघांच्यातही राजकीय जवळीक वाढायला लागली आहे. सोमवारी पोलिस दलातील नव्या वाहनांचे उद्घघाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होते. वाहनांची पूजा झाल्यानंतर महाडिक यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मुश्रीफ यांना पाठीमागे घेतले आणि मैदानावर फेरी मारली. आता लोकसभेच्या प्रचारात ही जोडी महायुतीच्या विजयासाठी अग्रभागी राहणार आहे. याची झलकच यानिमित्ताने पहावयास मिळाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकPoliticsराजकारण