‘कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर्स’तर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:34+5:302021-03-04T04:47:34+5:30

कोल्हापूर : ग्रामीण भागातील तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामांना नगर रचनाकारांच्या परवानगीची गरज लागणार नाही, असा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन ...

Minister Hasan Mushrif felicitated by Kolhapur Civil Engineers | ‘कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर्स’तर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

‘कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर्स’तर्फे मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

Next

कोल्हापूर : ग्रामीण भागातील तीनशे चौरस मीटर भूखंडावरील बांधकामांना नगर रचनाकारांच्या परवानगीची गरज लागणार नाही, असा निर्णय ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला. त्याबद्दल त्यांचा कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील गावठाणाव्यतिरिक्त वाढीव गावठाण आणि गुंठेवारी, प्लॉटिंग झालेले अंदाजे ९० टक्के क्षेत्र आहे. त्यामध्ये बांधकाम परवानगी मिळावी, अशी मागणी या असोसिएशनने केली. महापालिका, नगर परिषद, प्राधिकरण आदी ‌ठिकाणी इंजिनियर्स यांना प्रत्येक कार्यालयाचे लायसन्स काढावे, असे प्रशासन सांगते. पण, युनिफाइड बायलॉजमधील तरतुदीनुसार एकाच ठिकाणी लायसन्स जर असेल, तर इतर कार्यालयाचे स्वतंत्र लायन्स काढण्याची आवश्यकता नसल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पोवार, उपाध्यक्ष संजय मांगलेकर, सचिव चंद्रकांत कांडेकरी, खजानिस जितेंद्र लोहार, संचालक एम. जी. कुंभार, विजय पाटील, सुजीत भोसले, अनिल भालेकर, राजू लाड, मोहन गोखले, संतोष मंडलिक, सदस्य सुधाकर पुरेकर, विजय पारळे, अजित कदम, उपेंद्र जोशी, माजी नगरसेवक राजेंद्र लाटकर उपस्थित होते.

फोटो (०३०३२०२१-कोल-सिव्हिल इंजिनियर्स) : कोल्हापूर सिव्हिल इंजिनियर्स ॲण्ड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष सुनील पोवार यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. यावेळी शेजारी संचालक, सदस्य उपस्थित होते.

Web Title: Minister Hasan Mushrif felicitated by Kolhapur Civil Engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.