शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur-Local Body Election: निवडणूक गडहिंग्लज पालिकेची, प्रतिष्ठा पणाला ‘मुश्रीफ-कोरें’ची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 18:45 IST

दोघांच्या ‘दोस्ती’ची कसोटी आणि ‘प्रतिष्ठा’ पणाला लागली

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल, जनुसराज्य, भाजप, शिंदेसेना यांची महायुती असा चुरशीचा सामना होत आहे. किंबहुना, राष्ट्रवादी विरुद्ध जनता दल अशीच पारंपरिक लढाई आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे, तर महायुतीचे नेतृत्व आमदार डॉ. विनय कोरे यांच्याकडे आहे. म्हणूनच, दोघांच्या ‘दोस्ती’ची कसोटी आणि ‘प्रतिष्ठा’ पणाला लागली आहे.मंत्री मुश्रीफांनी यावेळीही राष्ट्रवादीचे स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवले असून, जनता दलाच्या नेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी सत्तेतील पक्षांसोबत महायुती करून मुश्रीफांना आव्हान दिले आहे. परंतु, महायुतीचे नेतृत्व अप्रत्यक्षरीत्या आमदार डॉ. कोरे हेच करीत आहेत.राष्ट्रवादीतर्फे माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे, माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, नरेंद्र भद्रापूर या दिग्गजांसह गुंड्या पाटील, अमर मांगले, महेश सलवादे, संतोष चिक्कोडे, रश्मीराज देसाई, राहुल शिरकोळे ही ‘यंग टीम’ ताकदीने उतरली आहे. माजी उपनगराध्यक्षा रूपाली परीट व त्यांचे पती उदय परीट हे एकमेव दाम्पत्य मैदानात आहे. ‘मनसे’चे नागेश चौगुलेही राष्ट्रवादीसोबत आहेत.जनता दलाच्या माजी नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, राजेश बोरगावे, उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, नितीन देसाई, सुनिता पाटील हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. जनसुराज्य व भाजपाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.‘राष्ट्रवादी’च्या प्रचारासाठी मंत्री मुश्रीफांनी गडहिंग्लजमध्ये तळच ठोकला आहे. मात्र, कोरे हे वारणेतूनच येथील प्रचाराची सूत्रे हाताळत असून, अंतिम टप्प्यात येथील मैदानात थेट उतरण्याची शक्यता आहे. महायुतीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, ‘जनसुराज्य’चे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी गडहिंग्लजचा दौरा केला आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार विनोद बिलावर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश कांबळे यांनी नगराध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांना आव्हान दिले आहे. उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका श्रद्धा शिंत्रे स्वतंत्र लढत आहेत.न्यायालयीन लढाई सुरू राहणारनगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असले तरी प्रमुख दोन्ही पॅनलने ‘बेडा-जंगम’ समाजातील उमदेवारांनाच ही संधी दिली आहे. परंतु, ‘राष्ट्रवादी’चे बंडखोर उमेदवार विनोद बिलावर यांनी ‘महायुती’चे गंगाधर हिरेमठ व ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार महेश तुरबतमठ यांच्या जातीच्या दाखल्यांना हरकत घेतली असून, हा वाद आता उच्च न्यायालयात गेला आहे. त्यामुळे निवडणूक झाली तरी न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Gadhinglaj Municipal Election a Prestige Fight for Mushrif and Kore.

Web Summary : Gadhinglaj witnesses a fierce battle between NCP and Mahayuti (Janta Dal, BJP, Shinde Sena), led by Mushrif and Kore respectively. The election tests their influence with both sides fielding strong candidates. A court battle over caste certificates adds another layer of complexity.