शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

By विश्वास पाटील | Updated: October 2, 2023 17:36 IST

'मुंबईतील बैठकीला कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची'

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. मराठा आंदोलनांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार आहे, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सोमवारी प्रसिद्धीला दिले आहे. मराठा समाजाला मंत्री मुश्रीफ यांनी नेहमीच पाठबळ दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही त्यांची भूमिका त्यांनी अनेकवेळा स्पष्ट केली आहे.या पत्रकावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, सरचिटणीस बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने- पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, महिला जिल्हाध्यक्षा  शितल फराकटे, कागलचे नगरसेवक नितीन दिंडे, राष्ट्रवादीचे इचलकरंजीचे शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे, विनायक फाळके, प्रकाश गवंडी या प्रमुखांच्या सह्या आहेत.पत्रकात  म्हटले आहे की, १५ ऑगस्टला शासकीय ध्वजारोहनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी सकल मराठा समाजाच्या मागणीनुसार त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.  त्या बैठकीमध्ये हा प्रश्न माझ्या एकट्याच्या पातळीवरील नसून यासंदर्भात मुंबईत बैठक लावू, असेही त्यांनी सुचित केले होते. दरम्यानच्या काळात जालना येथे मनोज जरांगे -पाटील यांनी उपोषण सुरूही केले. तिथे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद म्हणून महाराष्ट्रभर मोठा असंतोष निर्माण झाला. त्याच कालावधीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरामध्ये दहा सप्टेंबरला राष्ट्रवादीची उत्तरदायित्व सभा होती. त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घेत राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यामुळे कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित झाले. जरांगे- पाटील यांचा विषय ज्वलंत बनल्याने उपमुख्यमंत्री पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली नाही. ही सर्व वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, गैरसमज करून घेऊ नये. ज्यावेळी मुख्यमंत्री बैठक बोलावतील त्यावेळी कोल्हापुरातील शिष्टमंडळाला बोलवण्याची जबाबदारी आमची राहील असेही सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणHasan Mushrifहसन मुश्रीफ