शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

By समीर देशपांडे | Updated: November 24, 2022 18:56 IST

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भेटीवरुन केसरकरांनी साधला निशाणा

कोल्हापूर : ज्यांनी हिंदूंची राममंदिर रथयात्रा अडवली त्यांच्याच मुलासमोर लोटांगण घालणारे जनतेसमोर उघडे पडले आहेत. सत्तेसाठी कोणापुढेही ते लोटांगण घालतात हे पुन्हा दिसून आल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यावरुन केसरकरांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.मंत्री केसरकर म्हणाले, पंचवीस वर्षे सत्ता असलेल्यांना मुंबईमध्ये सुविधा देता आल्या नाहीत. आम्ही आता सिध्दिविनायक आणि मुंब्रा देवीच्या ठिकाणी पार्किंगची सुविधाउपलब्ध करून देत आहोत. ज्यांनी गोवर लस घेतली नाही अशा मुलांचे अधिक संख्येने मृत्यू झाले आहेत. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे असेही त्यांनी सांगितले.सीमाप्रश्नी सामंजस्याने मार्ग काढूसीमाप्रश्नाबाबत आम्ही सामंजस्याने मार्ग काढू, कर्नाटकची भाषा चुकीची आहे. त्यांनी आधी सीमाभागामध्येदोन कन्नडबरोबरच मराठी पाट्या लावायला परवानागी द्यावी.राजू शेट्टींनी तडजोड करावीऊस दरप्रश्नी स्वाभिमानीच्या उद्याच्या चक्का जाम आंदोलनाबाबत केसरकर म्हणाले, कोल्हापूरमधील अनेक कारखान्यांनी चांगले दर जाहीर केले आहेत. आंदोलन शेतकरी आणि कारखानदार दोघांच्याही हिताचे नसल्याने राजू शेट्टी यांनी तडजोड करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांची भेट घडवून देण्यास मी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.जगभरातील मराठी माणसांचा मुंबईत मेळावा घेण्याचे नियोजनजगभरातील मराठी माणसांचा मोठा मेळावा मुंबईत घेण्याचे नियोजन असून यामध्ये तंजावरचे भोसले, होळकर, गायकवाड, सिंदिया यांचाही समावेश असेल. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 'त्याचे' उदाहरण म्हणजे संजय राऊतसंजय राऊत हे आदरणीय संपादक आहेत. परंतू मराठी भाषा किती वाईट पध्दतीने वापरली जाते याचे ते उदाहरण असल्याची टीकाही केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAditya Thackreyआदित्य ठाकरेTejashwi Yadavतेजस्वी यादवDipak Kesarkarदीपक केसरकर