शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 12:06 IST

आगामी विधानसभेसाठी दिले खुले आव्हान

कोल्हापूर : विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीत भाजप व शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेचे उमेदवार पाडण्याचे षडयंत्र तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचेच होते. असा घणाघातील आरोप भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांना शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. आगामी विधानसभा निवडणूकीत त्यांनी कोल्हापूरातील कोणत्याही मतदारसंघातून उभे रहावे, चितपट करु, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.आर. डी. पाटील म्हणाले, भाजपमध्ये तीस वर्षापेक्षा अधिक काळ प्रामाणिकपणे काम केले. पक्षाचा पहिला नगरसेवक म्हणून निवडून येत असतानाच महापालिकेच्या सभागृहात सलग २५ वर्षे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पण, पक्ष सत्तेत आल्यानंतर जुन्या पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूर महानगर अध्यक्षही दिले नाही. देवस्थान समितीचे अध्यक्ष करण्याचा शब्द दिला तोही पाळला नाही.विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत शासकीय यंत्रणेचा अहवाल आपणाला उमेदवारी द्यावा, असा असताना दुसऱ्याला दिली. २०१९ च्या निवडणूकीत भाजपच्या काेअर कमिटीत आपण होतो. त्यावेळी शिवसेनेचे सहाही उमेदवार पाडण्याची रणनिती चंद्रकांत पाटील यांनी आखली होती. ‘शिरोळ’ येथे अनिल यादव यांना, तर हातकणंगले येथे भाजपचे अशोकराव माने यांना जनसुराज्यकडे पाठवले. ‘चंदगड’मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक शिवाजी पाटील हे विजयी होणार म्हणून तिथे अशोक चराटी यांना बंडखोरी करायला लावली.अमल महाडीक, सुरेश हाळवणकर यांच्या पराभवाला कारणीभूत कोण आहे? हे जगजाहीर आहे. पक्षात अशाच व्यक्तींच्या शब्दाला मान असेल आणि आयुष्य पक्षासाठी घालणाऱ्या आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची किमंत नसेल तर पक्षात कशाला रहायचे? म्हणून पक्ष सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आर. डी. पाटील यांनी सांगितले.बिन आवाजाचा बॉम्बआगामी विधानसभा निवडणूकीच्या अगोदर कोल्हापूरात बिन आवाजाचा बॉम्ब फोडणार आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मग, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पाटील यांना मंत्री सोडाच पण विधानसभेची उमेदवार देणार नसल्याचा इशारा आर. डी. पाटील दिला.

देवाणघेवाण करूनच आर. डी. पाटील यांचे आरोप - महेश जाधवकोल्हापूर : बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नसतो हे आर. डी. पाटील यांनी लक्षात ठेवावे. पाच वर्षांपूर्वीच्या प्रकाराची पाटील यांना आत्ताच का आठवण झाली? देवाणघेवाण करूनच पाटील यांनी केवळ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बदनामीसाठी हे आरोप केले आहेत, असे पत्रक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिले आहे.जाधव म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी एक सोडून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाडण्याचे आदेश दिले, असा बिनबुडाचा आरोप पाटील यांनी केला. ज्या आर. डी. पाटील यांचे राजकारण चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यावर उभारले, तेच कृतघ्न होऊन विरोधी गोटात दाखल झाले आहेत. गेल्या वेळी महापालिकेला केवळ हट्टापायी तुम्हाला व तुमच्या कन्येला तिकीट दिले. पण तुम्ही दोन्ही मतदारसंघात हरलात. पुन्हा आरोप केल्यास भाजप कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४chandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv Senaशिवसेना