मिणचेत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाणंद रस्ता केला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:38 IST2021-05-05T04:38:57+5:302021-05-05T04:38:57+5:30

मिणचे येथील मनेराअंतर्गत सिंचन विहीर व पाणंद रस्त्यामुळे धनगर समाजाची शेतजमीन असलेल्या एकूण ३०० एकर ...

Minchet Gram Panchayat and villagers opened Panand Road | मिणचेत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाणंद रस्ता केला खुला

मिणचेत ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाणंद रस्ता केला खुला

मिणचे येथील मनेराअंतर्गत सिंचन विहीर व पाणंद रस्त्यामुळे धनगर समाजाची शेतजमीन असलेल्या एकूण ३०० एकर क्षेत्राला फायदेशीर अशा एक किलोमीटर लांबी व २१ फुटाच्या रस्त्यामुळे येथील शंभरहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला आहे. या रस्त्याअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असे. ही पाणंद १० फूट होती. शेतकऱ्यांनी अतिक्रमणे काढून व स्वतःची आणखी जागा दिली. हे काम लोकसहभागातून व स्थानिक १२ ते ४० मजूर श्रमदान करणार आहेत. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बिकट होत होती. चिखलातून शेतवडी भागात जावे लागत होते. या रस्त्यामुळे मिणचे गावातून थेट छत्रपती शिवाजी विद्यानिकेतनपर्यंत रस्ता होणार आहे.

यावेळी उपसरपंच अभिनंदन शिखरे यांनी केले. तर ग्रामसेवक धनाजी शिंदे यांनी आभार मानले.

पाणंद रस्ता करण्यासाठी मारुती वाकसे, लक्ष्मी वाकसे, आनंदा वाकसे, शांताबाई वाकसे, तुकाराम वाकसे, विश्वनाथ वाकसे, सविता वाकसे, आण्णाप्पा वाकसे, सुशिला वाकसे, उत्तम वाकसे, राणी वाकसे, सुजाता वाकसे यांनी श्रमदान केले.

फोटो ओळ

पेठवडगाव : मिणचे (ता. हातकणंगले ) येथे पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रारंभ गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सरपंच रंजना जाधव, उपसरपंच अभिनंदन शिखरे, संभाजी जाधव, माजी सरपंच सर्जेराव वाकसे, ग्रामविस्तार अधिकारी धनाजी शिंदे आदी उपस्थित होते. (छाया : क्षितिज जाधव)

Web Title: Minchet Gram Panchayat and villagers opened Panand Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.