हेरले व मौजे वडगाव येथील कोविड सेंटरला मिणचेकर यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:41+5:302021-06-23T04:16:41+5:30
माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, या गावासाठी आपण ही काही देणे लागतो. या हेतूने कोविड सेंटरला गावातील डॉक्टर ...

हेरले व मौजे वडगाव येथील कोविड सेंटरला मिणचेकर यांची भेट
माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, या गावासाठी आपण ही काही देणे लागतो. या हेतूने कोविड सेंटरला गावातील डॉक्टर यांनी मोफत सेवा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करत आभार मानले.
माजी सभापती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, मेडिकल व एमआर असोसिएशन, आशा स्वयंमसेविका,अंगणवाडी सेविका या सर्वांनी गावासाठी दिलेले योगदान व केलेल्या उपाययोजनामुळे कोरोनाची परिस्थिती आज नियंत्रणात आली आहे. आपण केलेले योगदान जनता कधी ही विसरणार नाही, असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कोरोना आजाराने बरे झालेल्या रुग्णांना डीस्चार्जचे पत्र देण्यात आले.
यावेळी माजी सभापती राजेश पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच प्रतिनिधी संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले, माजी उपसरपंच राहुल शेटे, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रणजित इनमादर, संदीप मिरजे, इब्राहीम खतीब, तुषार आलमान, मंदार गडकरी, डॉ. अमोल चौगुले, डॉ. आर. डी. पाटील, डॉ. महावीर पाटील, सरपंच काशिनाथ कांबळे, विजय मगदूम, माजी उपसरपंच किरण चौगुले, महेंद्र कांबरे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो: हेरले (ता. हातकणंगले) येथील मोफत विलगीकरण केंद्राची पाहणी करून रुग्णांना डिस्चार्जचे पत्र देताना माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर माजी सभापती राजेश पाटील पोलीस पाटील नयन पाटील व अन्य मान्यवर.