मिणचेकर म्हणतात... मंत्रिपदासाठी अडीच वर्षांपासून इच्छुक

By Admin | Updated: April 3, 2017 18:59 IST2017-04-03T18:59:06+5:302017-04-03T18:59:06+5:30

पक्षप्रमुख सकारात्मक विचार करतील

Minachekar says ... interested for the minister for two and a half years | मिणचेकर म्हणतात... मंत्रिपदासाठी अडीच वर्षांपासून इच्छुक

मिणचेकर म्हणतात... मंत्रिपदासाठी अडीच वर्षांपासून इच्छुक

आॅनलाईन लोकमत कोल्हापूर : कोल्हापूरकरांनी शिवसेनेला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे यावेळी पक्षप्रमुख कोल्हापूरला मंत्रिपद देण्याबाबत सकारात्मक विचार करतील. गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदासाठी इच्छुक आणि प्रतीक्षा यादीमध्ये आहे, असे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी सोमवारी येथे सांगितले.

शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत त्यांनी हे सांगितले. आमदार मिणचेकर म्हणाले, सध्या शिवसेनेच्या मंत्रिपदावरील खांदे पलटण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेला कोल्हापूरकरांनी चांगली साथ दिली आहे. जिल्ह्यात आमचे सहा आमदार आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदासाठी मी इच्छुक आणि प्रतीक्षा यादीमध्ये आहे. संबंधित यादीमध्ये अग्रस्थानी होतो.

यावेळी सेनेच्या मंत्रिपदाच्या खांदेपालटाची चर्चा सुरू आहे. पक्षप्रमुख कोल्हापूरबाबत सकारात्मक विचार करतील अशी आशा आहे. दरम्यान, भाजपमधील प्रवेशाबाबत ते म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीनंतर मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ती निव्वळ अफवा आहे. मी सेना सोडून कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Minachekar says ... interested for the minister for two and a half years