कोट्यवधीचा भूखंड लाटण्याचा डाव फसला

By Admin | Updated: April 18, 2015 00:01 IST2015-04-17T23:48:23+5:302015-04-18T00:01:57+5:30

महापालिका सतर्क : मूळ मालकाला प्लॉट पाडण्यापासून अडविले

Millennium Plot | कोट्यवधीचा भूखंड लाटण्याचा डाव फसला

कोट्यवधीचा भूखंड लाटण्याचा डाव फसला

सांगली : महापालिका हद्दीतील कोट्यवधी रुपयांचा भूखंड लाटण्याचा डाव शुक्रवारी प्रशासनाने हाणून पाडला. येथील शंभरफुटी रस्त्यावरील हा प्लॉट मूळ मालकाने विकसित करण्याचा प्रयत्न चालविला होता. याची माहिती मिळताच सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्लॉट पाडण्यास मूळ मालकाला अटकाव केला.
शंभरफुटी रस्त्यावरील सुतार प्लॉटमध्ये पालिकेच्या मालकीचा तीन हजार स्वेअर फुटाचा खुला भूखंड आहे. या भूखंडावर नाव लावण्यासाठी दोन वर्षापासून पालिकेने सिटी सर्व्हे कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. पण सिटी सर्व्हे कार्यालयाने पालिकेचे नावच लावले नव्हते. अद्यापही या भूखंडावर मूळ मालकाचे नाव आहे. याचा फायदा घेत मूळ मालकाने खुल्या भूखंडावर शुक्रवारी प्लॉट पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. याची माहिती मिळताच सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
हा भूखंड महापालिकेच्या मालकीचा असून प्लॉट पाडण्यास प्रतिबंध केला. या भूखंडाची कागदपत्रेही वाघमारे यांनी मूळ मालकाला सादर केली. त्यानंतर मूळ मालकाने प्लॉट पाडण्याचे काम थांबविले.
पालिकेने दोन वर्षापासून या भूखंडावर नाव लावण्यासाठी सिटी सर्व्हे कार्यालयाला कळविले, पण त्यांनी कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड हातून निसटणार होता. याबाबत वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन नाव लावण्याबाबत आदेश व्हावेत, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)


वसंत कॉलनीतील जागा नावावर
सांगलीतील वसंत कॉलनी येथे मंजूर रेखांकनातील खुल्या जागेवर अद्यापही महापालिकेचे नाव लागले नव्हते. याबाबत संभाजी सावंत यांनी नगरभूमापन अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला. गेल्या आठवड्यात पालिकेच्या नगररचना विभागाने कब्जेपट्टी व रेखांकनाची प्रत सिटी सर्व्हेला दाखल करुन ही जागा पालिकेच्या नावावर नोंद करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Millennium Plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.