दूध संस्था कर्मचाऱ्यांना ‘ईएसआयसीचा’ला देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST2021-02-05T07:14:27+5:302021-02-05T07:14:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या समासदांना ईएसआयसी योजनेतून आरोग्य सुविधा देण्यात येणार ...

दूध संस्था कर्मचाऱ्यांना ‘ईएसआयसीचा’ला देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या समासदांना ईएसआयसी योजनेतून आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष के . डी . पाटील यांनी केली. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंड योजनाही लागू केली आहे. त्याचा लाभ सर्व कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
दूध संस्था कर्मचारी संघटनेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी व्ही. टी. पाटील सभागृहात झाली. अध्यक्ष पाटील म्हणाले, गेल्या २१ वर्षांत चिकाटीने केलेला कारभार आणि ‘गोकुळ’च्या मदतीतून आज संघटना भक्कमपणे उभी आहे. सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. सभासद व त्याच्या पत्नीला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण, तर सभासदाचा नैसर्गिक मृत्यू आल्यास तीस हजार रुपये मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
यावेळी विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. सभासदांच्या दहावी व बारावीतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. सुभाष गुरव, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील यांनी आभार मानले.