शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

मिलिंद सोमण ‘डबल आयर्नमॅन’साठी सज्ज-कोल्हापूर परिसराला पसंती : सायकलिंग, पोहणे, धावणे असा २१ तास केला सराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:12 IST

परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाºया डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन

सचिन भोसले ।कोल्हापूर : परदेशातील थंड हवामानाला पोषक ठरणाऱ्या कोल्हापूरला पहिली पसंती देत प्रसिद्ध मॉडेल व आयर्नमॅन मिलिंद सोमण याने लिथोव्हेनिया येथे होणाऱ्या डबल अल्टा आयर्नमॅन स्पर्धेच्या तयारीसाठी गेल्या दोन दिवसांत ४ तास पोहणे, ७ तास सायकलिंग व १० तास धावणे असा तब्बल २१ तास कसून सराव परिसरात केला.मिलिंद सोमण याचे काल (बुधवारी) दुपारी १ वाजता आगमन झाले.

तत्काळ दोन वाजता मिलिंदने आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील तलावात चार तास पोहण्याचा सराव केला. त्यानंतर सहा वाजता कोल्हापूर ते बागलकोट (कर्नाटक) पुन्हा कोल्हापूर येथंपर्यंतच्या सायकलिंग प्रवासासाठी सुरुवात केली. त्यात त्याने सलग सात तासांत ३६० किलोमीटर सायकलिंग केले. त्याची ही सायकलिंग सफर गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पूर्ण झाली. त्यानंतर तत्काळ काही मिनिटांचा ब्रेक घेऊन त्याने पुन्हा ८० किलोमीटर धावण्यास प्रारंभ केला. हे त्याने धावणे सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर त्याने पुन्हा मुंबईकडे प्रयाण केले. त्याच्यासोबत पत्नी अंकिता व आई उषा सोमण याही त्याच्याबरोबर पायलटिंग करत आहेत.

त्यात विशेष म्हणजे पत्नी अंंकिता हिनेही त्याच्याबरोबर सायकलिंग, धावणे, पोहणे याचा सराव केला.त्याच्या मदतीसाठी कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, उदय पाटील, वैभव बेळगांवकर, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. सूरज बागवान, आदित्य शिंदे, बलराज पाटील, नीलय मुधाळे, वरद पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे, सुप्रिया निंबाळकर, यश चव्हाण, अशिष तंबाके, रजनीकांत पाटील, अमर धामणे यांनी गेले दोन दिवस सहकार्य केले. त्यातील अनेकांनी त्याला दोन तासाहून अधिक धावणे, सायकलिंग, पोहण्यासाठी साथ दिली.स्कॉटलंड येथे दि. ४ नोव्हेंबर १९६५ ला जन्मलेला मिलिंद काही वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर भारतात परतला. इलेक्ट्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या मिलिंदने सन १९८४-८५ मध्ये महाराष्ट्रातर्फे राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. ३० दिवसांत १५०० कि.मी. धावण्याचा लिम्का विक्रमही त्याच्या नावावर आहे. यासह २०१५ मध्ये आयर्न मॅन किताब पटकाविताना त्याने ३.८ कि.मी. पोहणे, १८०.२ कि.मी. सायकलिंग, ४२.२ कि.मी. धावणे अशी १५ तास १९ मिनिटांची न थांबता नोंद केली आहे. 

कोल्हापूरचे वातावरण परदेशातील वातावरणासारखे थंड, गरम असे आहे. सरावाकरिता हे पोषक वातावरण असल्याने मिलिंदने दोन दिवसांचा सराव याठिकाणी केला.- उषा सोमण ,  मिलिंद सोमणच्या आई

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर