गडमुडशिंगीत मायलेकीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:05+5:302021-04-16T04:24:05+5:30

बुधवारी (दि.14) रोजी सकाळी तेजस्विनी घरातून मुलीसह बेपत्ता झाली होती. गुरुवारी दुपारी त्या दोघींचा मृतदेह परांडा पानंद येथील विहिरीत ...

Mileki's suicide in Gadmudshing | गडमुडशिंगीत मायलेकीची आत्महत्या

गडमुडशिंगीत मायलेकीची आत्महत्या

बुधवारी (दि.14) रोजी सकाळी तेजस्विनी घरातून मुलीसह बेपत्ता झाली होती.

गुरुवारी दुपारी त्या दोघींचा मृतदेह परांडा पानंद येथील विहिरीत आढळून आला. गडमुडशिंगी येथील दाजी नामदेव गिरुले यांची तेजस्विनी मुलगी आहे. तिचा विवाह चार वर्षांपूर्वी सांगवडेवाडी येथील किरण मोरे यांच्याशी झाला होता. त्यांना तीन वर्षांची अक्षरा ऊर्फ काव्या नावाची मुलगी होती. मुलगी झाल्यानंतर घरी कौटुंबिक वादाला सुरुवात झाली. त्यातून दोन वर्षांपासून तेजस्विनी मुलीसह गडमुडशिंगी येथे वडिलाकडे राहत होती. न्यायालयात पोटगी दावाही दाखल झाला होता. या सर्व प्रकारामुळे तेजस्विनी नैराश्यात होती. यातून तिने मुलगी अक्षराला घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फोटो : १५

तेजस्विनी मोरे व अक्षरा मोरे.

Web Title: Mileki's suicide in Gadmudshing