मिका सिंग शनिवारी कोल्हापुरात

By Admin | Updated: July 24, 2014 00:07 IST2014-07-23T23:55:00+5:302014-07-24T00:07:55+5:30

कार्यक्रमाची तयारी पूर्ण : सत्त्वशील माने यांची माहिती

Mika Singh on Saturday in Kolhapur | मिका सिंग शनिवारी कोल्हापुरात

मिका सिंग शनिवारी कोल्हापुरात

कोल्हापूर : केबीएन एंटरटेनमेंट यांच्यावतीने प्रसिद्ध पॉप सिंगर मिका सिंग लाईव्ह इन कोल्हापूर हा कार्यक्रम शनिवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजता मुस्कान लॉन, मार्केट यार्ड येथे होणार आहे. या कार्यक्रमाची सर्व तयारी झाली आहे. पावसाचा कोणताही अडथळा होऊ नये म्हणून प्रेक्षकांसाठी वॉटरप्रूफ मंडप उभारला आहे, अशी माहिती संयोजक सत्त्वशील माने यांनी दिली.
अनाथ मुलांच्या तसेच एड्सग्रस्त व कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम घेतला जात आहे. मिका सिंग यांच्यासोबत डान्स परफॉर्मन्ससाठी बॉलिवूडची अभिनेत्री प्राची देसाई, अनुषा दांडेकर, अभिनेत्री अनिता हंसनंदानी सहभागी होणार आहेत.
डी. जे. लेमन यांचा आॅर्केस्ट्रा असून त्यास ए. जे. विराट हे संगीतसाथ देणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Mika Singh on Saturday in Kolhapur