शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सुतारवाडा येथील नऊ कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:43 IST

नदीचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले होते. गुरुवारी सकाळी सुतारवाड्यात पाणी पोहोचले. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता गृहीत

ठळक मुद्देमहापालिकेची यंत्रणा सज्ज : पावसाचा जोर कमी; पूरस्थिती कायम; महापौरांकडून पाहणी

कोल्हापूर : शहर आणि परिसरातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेची यंत्रणाही सज्ज झाली असून, पुराचे पाणी आलेल्या दसरा चौक येथील सुतारवाडा वसाहतीत राहणाऱ्या नऊ कुटुंबांचे गुरुवारी सकाळी चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंग येथे स्थलांतर करण्यात आले.

शहरात गुरुवारी पावसाने बरीच उघडीप दिली. मात्र, राधानगरी धरणाचे चार दरवाजे अद्यापही उघडलेले असल्याने नदीची पाणीपातळी वाढत आहे. नदीचे पाणी जामदार क्लबपर्यंत आले होते. गुरुवारी सकाळी सुतारवाड्यात पाणी पोहोचले. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या. पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता गृहीत धरून खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

शहरात काही ठिकाणी सखल भागात पुराचे पाणी आले असल्याने गुरुवारी शहरातील पूर परिस्थितीची पाहणी महापौर माधवी गवंडी, उपमहापौर भूपाल शेटे, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदाधिकारी व अधिकारी यांच्यासमवेत केली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना महापौर गवंडी यांनी दिल्या.स्थलांतरित नागरिकांसाठी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी लाईट, पाण्याची व्यवस्था नीटनेटकी करावी, आरोग्य पथकेकार्यरत ठेवावीत, औषध फवारणी करावी, अशा सूचनाही महापौरांनी दिल्या. चित्रदुर्ग मठ येथे चार कुटुंबे व मुस्लिम बोर्डिंग येथे पाच कुटुंबे स्थंलातरित करण्यात आली आहेत. या कुटुंबाचीही महापौरांनी चौकशी केली. यावेळी सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, राहुल चव्हाण, लाला भोसले, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता आर. के. जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, मिलिंद जाधव उपस्थित होते.

पूरस्थितीचा सामना करण्यास महापालिकेची यंत्रणा सज्ज असून, ज्या भागात पाणी आले आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतर करण्यात येत आहे. सर्व अधिकाºयांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांनी स्थलांतर होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त कलशेट्टी यांनी केले.

भिंती कोसळण्याचे प्रकारगुरुवारी शहरात मार्केट यार्ड व रंकाळा बसस्थानक परिसरात घराच्या भिंती कोसळण्याचे प्रकार घडले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मार्केट यार्डात भिंत कोसळण्याची शक्यता असल्याची वर्दी अग्निशमन दलास मिळाली. तेव्हा बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांनी तातडीने जाऊन ती भिंत उतरवून घेतली. दाभोळकर कॉर्नर, विश्वपंढरी परिसरात झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या.या फोनवर संपर्क साधावाआपत्कालीन स्थितीच्या मुकाबल्यासाठी महापालिकेच्या इमारतीमधील अग्निशमन विभागाकडे मुख्य आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १०१ असा आहे. तसेच आरोग्य विभागाच्या आपत्तीकाळातील तक्रारींसंदर्भात दूरध्वनी क्रमांक २५४०२९० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत चार विभागीय कार्यालयांमध्ये दक्षता पथके चोवीस तास कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी