४० हजार नागरिकांचे स्थलांतर, २६२ गावे पूरबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:16 IST2021-07-24T04:16:34+5:302021-07-24T04:16:34+5:30
कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील २६२ गावे बाधित झाली आहेत. त्यात ३४ गावे पूर्णत: पाण्यात असून २२८ गावांना अंशत: फटका ...

४० हजार नागरिकांचे स्थलांतर, २६२ गावे पूरबाधित
कोल्हापूर : पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील २६२ गावे बाधित झाली आहेत. त्यात ३४ गावे पूर्णत: पाण्यात असून २२८ गावांना अंशत: फटका बसला आहे. शुक्रवारपर्यंत ९ हजार ९१७ गावांतील कुटुंबांतील ४० हजार ८८२ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे, तर स्थलांतरित जनावरांची संख्या १५ हजार २९६ इतकी आहे.
गेल्या दोन दिवसांत पावसामुळे ५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्यात राधानगरीतील दोन, चंदगडमधील दोन व कागलमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. शाहुवाडीतील सावर्डी येथील दोन जनावरे भूस्खलनामुळे गाडली गेली आहेत, तर मलापुरातील एक म्हैस पुरात वाहून गेली आहे. पुरामुळे १० राज्यमार्ग तर २९ जिल्हामार्ग बंद झाले आहेत. तसेच अन्य जिल्ह्यांना जाणारे १० व ग्रामीणचे १८ मार्ग बंद झाले आहेत.
----