शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: कारखान्यातील कामाच्या वादातून शहापुरात परप्रांतीय कामगाराचा खून, संशयित पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:48 IST

डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला

इचलकरंजी : किरकोळ वादातून शहापूर पोलिस ठाण्यासमोरील परिसरात सोमवारी रात्री यंत्रमाग कारखान्याच्या दारात कामगाराचा निर्घृण खून झाला. संतोष गोपाल पांडा (वय ३८, रा. मूळ ओडिशा, सध्या रा. विनायक हायस्कूल समोर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. घटनेनंतर चार ते पाच परप्रांतीय संशयित कामगार पसार झाले. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिसात सुरू होते.घटनास्थळ आणि आयजीएम रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी, शहापूर येथील एका यंत्रमाग कारखान्यात संतोष व इतर संशयित हल्लेखोर एकत्र काम करतात. त्यांच्यात काही दिवसांपासून काम करण्यावरून वाद सुरू होता. बुधवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. तो मिटवण्यात आला होता. मात्र, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा जोरात भांडण सुरू झाले. वाद घालत सगळे कारखान्याबाहेर आले. यावेळी वाद अधिकच विकोपाला गेला आणि हल्लेखोर कामगारांनी अचानक लोखंडी हत्यार उचलून संतोष पांडा याच्यावर हल्ला चढवला. डोक्यात व तोंडावर सपासप वार झाल्याने संतोष रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. हा गोंधळ एकूण इतर कामगार बाहेर आले. त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या संतोष पांडा याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, या प्रकरणातील चार ते पाच संशयित परप्रांतीय कामगार हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. शहापूर पोलिस ठाण्याचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.