शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लोखंडी सळी विद्युत वाहिनीला लागली, विजेच्या धक्क्याने परप्रांतीय बांधकाम मजूराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 19:22 IST

सरदार चौगुले पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी कुऱ्हाडवाडी येथे बंगल्याचा जिना चढताना खांद्यावरील लोखंडी सळीचा स्पर्श ११ ...

सरदार चौगुलेपोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील वाघवेपैकी कुऱ्हाडवाडी येथे बंगल्याचा जिना चढताना खांद्यावरील लोखंडी सळीचा स्पर्श ११ हजार केव्हीच्या विद्युत वाहिनीला होऊन वीजेच्या धक्क्याने परप्रांतीय बांधकाम मजूराचा मृत्यू झाला. सुरेश सुखदेव हसबे (वय २१, रा. उकली, ता.बागेवाडी, जि.विजापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज, शनिवारी (दि.२९) रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.पोलिसांकडून, घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोतोली फाटा ते नांदगाव रस्त्याचे नवीन क्रॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. वाघवे ते पिंपळे तर्फ ठाणे दरम्यानच्या रस्त्यावरील जकिन ओढाचे नवीन बांधकाम सुरू आहे. या कामासाठी सुरेश हसबे हा तरुण आपल्या सहकार्यसमवेत विजापूरहून आठ दिवसापूर्वी वाघवे येथे आला होता. वाघवेपैकी कुऱ्हाडवाडी फाट्याजवळील एका बंगल्यात भाडोत्री म्हणून राहत होते. सुरेश शनिवारी सकाळी पुलाच्या ठिकाणी काम करून, राहत असलेल्या बंगल्यावर खांद्यावर लोखंडी सळी घेवून जीना चढत होते. दरम्यान खाद्यांवरील लोखंडी सळीचा स्पर्श बंगल्यावरून गेलेल्या विद्युत वाहिनीला झाल्याने विजेचा जोराचा धक्का बसल्याने ते जीनाच्या पायऱ्यावर कोसळले. त्यांना बेशुध्द अवस्थेत उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजDeathमृत्यू