शहरं
Join us  
Trending Stories
1
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
2
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
3
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
4
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
5
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
6
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
7
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
8
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
9
एक गावात अन् दुसरी शहरात, एका कॉलनं पतीचं गुपित उघडलं; २ बायकांचा धनी जेलमध्ये गेला, काय घडलं?
10
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
11
Nashik: नाशकात कडाक्याच्या थंडीत भल्या पहाटे सैन्यभरतीसाठी तरुणाई मैदानात!
12
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
13
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
14
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
15
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
16
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
17
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
18
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
19
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
20
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
Daily Top 2Weekly Top 5

पोट निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई: जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 15:51 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दत्तवाड(ता.शिरोळ) या मतदारसंघासाठी १२ डिसेंबरला तर चंदगड, हातकणंगले, शिरोळ, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या दिवशी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे पोट निवडणुकीत डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई: जिल्हाधिकारी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या दत्तवाड(ता.शिरोळ) या मतदारसंघासाठी १२ डिसेंबरला तर चंदगड, हातकणंगले, शिरोळ, करवीर, पन्हाळा तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या दिवशी मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी ऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये लोकसभा, विधानसभेची, स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा अन्य निवडणूक नुकतीच पार पडलेली असेल व मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर न मिटणाऱ्या शाईची निशाणी मिटलेली नसेल, त्यावेळी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक, पोटनिवडणुकीमध्ये मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्यात यावी.

जर मधल्या बोटालादेखील शाईची निशाणी असेल तर जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणुकीमध्ये मतदाराच्या कोणत्या बोटाला शाई लावण्यात येईल याबाबत आदेश काढावेत. त्यानुसार स्पष्ट सूचना संबंधित सर्व मतदान केंद्राध्यक्षांना द्याव्यात, असे निवडणूक आयोगाच्या आदेशात नमूद केले आहे.

याबाबत निवडणुकीसाठी कार्यरत असणाºया मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांनांही प्रशिक्षण दिवशी लेखी सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले आहे, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर