म्हारुळ, खाटांगळे, उपवडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:12+5:302021-01-08T05:17:12+5:30
सांगरुळ : सांगरुळ परिसरातील म्हारुळ, खाटांगळे, उपवडे या तीन ग्रामपंचायती अखेर बिनविरोध झाल्या. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तिन्ही ठिकाणी ...

म्हारुळ, खाटांगळे, उपवडे बिनविरोध
सांगरुळ : सांगरुळ परिसरातील म्हारुळ, खाटांगळे, उपवडे या तीन ग्रामपंचायती अखेर बिनविरोध झाल्या. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत तिन्ही ठिकाणी समझोता करण्यात आला.
सांगरुळ जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार चंद्रदीप नरके गटातच सामना पहावयास मिळतो. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष टाळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासूनच समझोत्याचे धोरण घेतले होते. खाटांगळेचे ग्रामदैवत विठलाई देवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने गावातील सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी कॉंग्रेस व शिवसेनेच्या गटात एकमत झाले.
म्हारुळ गावातील दूध संस्था कर्मचारी संघटनेने ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यात यश आले. तीन वाड्यांची ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या उपवडेमध्ये सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेते एकत्र आले आणि बिनविरोध केली.