म्हाकवेत घरीच बनविला गावगाड्याचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:26+5:302021-09-13T04:23:26+5:30
उन्हाळ्यात शेतामध्ये भल्या पहाटे शेताला पाणी देण्यासाठी बैलांच्या साहाय्याने सुरू असणारी मोट, डेरेदार वृक्षाखाली बसलेले गणराया, खळ्यावरील तिवढयांसभोवती फिरून ...

म्हाकवेत घरीच बनविला गावगाड्याचा देखावा
उन्हाळ्यात शेतामध्ये भल्या पहाटे शेताला पाणी देण्यासाठी बैलांच्या साहाय्याने सुरू असणारी मोट, डेरेदार वृक्षाखाली बसलेले गणराया, खळ्यावरील तिवढयांसभोवती फिरून सुरू असणारी जनावरांची मळणी, बैलगाडी शर्यतीतील सर्वोत्कृष्ट बैलजोडी आणि त्यांना मिळालेल्या बक्षिसांच्या ढाली यासह गावगाड्याचे दर्शन होते. ग्रामस्थांनी बामणकी वसाहतीमध्ये असणाऱ्या पाटील यांच्या घरी या गावगाड्याची रचना पाहण्यासाठी रीघ लावली आहे.
दरम्यान, कोरोना काळात कागल तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला होता. जुन्या काळातील परंपरागत शेती करण्याच्या आधुनिकीकरणामुळे लोप पावत आहेत, परंतु त्या काळात यामुळे योगदान मिळाले आहे. भावी पिढीला याची माहिती व्हावी, हा उद्देश आहे.
अमित बाबुराव पाटील, पोलीस पाटील, म्हाकवे
म्हाकवे येथिल पाटील कुटुंबीयांनी घरीच साकारलेल्या कृषिप्रधान संस्कृतीचा देखावा गावकऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.