झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:49+5:302021-04-30T04:29:49+5:30

इचलकरंजी : येथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा क्रूर प्रकार घडला. शहरात ...

A method of burning a tree by throwing acid on the trunk of the tree | झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा प्रकार

झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा प्रकार

इचलकरंजी : येथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातील रिक्षा स्टॉपजवळ असलेल्या झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा क्रूर प्रकार घडला. शहरात वृक्ष लागवडीसाठी अनेक जण प्रयत्न करीत असताना असा प्रकार घडल्यामुळे निसर्गप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.

निसर्गप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते झाडांचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी नेहमी झटत असतात. वृक्ष लागवडीसाठी शासन व सामाजिक संस्था अनेक वेळा पुढाकार घेतात. यासाठी शासन स्तरावर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सध्या कोरोनामुळे ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने झाडांचे महत्त्व अधिकच जाणवत आहे; मात्र काही महाभागांकडून झाड नष्ट करण्यासाठी झाडाच्या बुंद्यावर अ‍ॅसिड टाकून ते जाळण्याचा प्रकार झाला आहे. याचा निषेध करत परिसरातील नागरिकांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

फोटो ओळी

२८०४२०२१-आयसीएच-०३

इचलकरंजीत झाडाच्या बुंद्यावरच अ‍ॅसिड टाकून झाड जाळण्याचा क्रूर प्रकार घडला आहे.

Web Title: A method of burning a tree by throwing acid on the trunk of the tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.