शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवारपासून, कोल्हापूर शहरातील १६ शाळांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 16:19 IST

कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार (दि. १४) ते रविवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. यात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या १६ शाळांचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर ...

ठळक मुद्देमहावीर इंग्लिश स्कूलतर्फे आयोजनएकूण २७ हजार रुपयांची बक्षीसे दिली जाणार

कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूल आणि ब्लॉसम प्ले स्कूलच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा गुरुवार (दि. १४) ते रविवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. यात शहरातील इंग्रजी माध्यमाच्या १६ शाळांचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष गांधी म्हणाले, कोल्हापुरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळण्याची गोडी निर्माण व्हावी याउद्देशाने ‘एमईएस’ आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा होणार आहे. या विजयी संघाला रोख अकरा हजार रुपये, चषक, प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले जाईल. विविध गटात सांघिक आणि वैयक्तीक अशी एकूण २७ हजार रुपयांची बक्षीसे दिली जाणार आहेत.

महावीर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे म्हणाल्या, स्पर्धेत रोज सकाळी आठ ते दुपारी एक यावेळेत चार सामने होतील. सलामीचा सामना महावीर इंग्लिश स्कूल आणि फोर्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये होईल.

स्पर्धेचे उदघाटन गुरुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, केएसएचे मानद सचिव माणिक मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. अंतिम सामना रविवारी दुपारी बारा वाजता होणार असून यानंतर बक्षीस वितरण मधुरिमाराजे यांच्या हस्ते होईल. पत्रकार परिषदेस स्मिता गायकवाड, रणजित पारेख, केतन आडनाईक, राम यादव उपस्थित होते.

स्पर्धेतील सहभागी संघपोदार इंटरनॅशनल स्कूल, दुधगंगा व्हॅली इंग्लिश स्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल, संजीवन पब्लिक स्कूल (पन्हाळा), लिटल फलॉवर इंग्लिश स्कूल, विबग्योर इंटरनॅशनल, फोर्ट इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, महावीर इंग्लिश स्कूल, सेंट झेविअर्स इंग्लिश स्कूल, विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल, संजीवन प्राईमरी इंग्लिश स्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर इंग्लिश स्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश मेडियम स्कूल, छत्रपती शाहू विद्यालय. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉलSchoolशाळा