कोल्हापूरचा पारा ४१ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:57 IST2019-05-19T23:57:28+5:302019-05-19T23:57:33+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी पारा ४१ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण ...

The mercury of Kolhapur at 41 degrees | कोल्हापूरचा पारा ४१ अंशावर

कोल्हापूरचा पारा ४१ अंशावर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, रविवारी पारा ४१ डिग्रीपर्यंत पोहोचला होता. उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले असून, दुपारी तीनपर्यंत शहरातील अनेक रस्ते ओस पडले होते.
रविवारी कमाल तापमान ४१ डिग्रीपर्यंत राहिल्याने दिवसभर रस्त्याने चालताना गरम झळा अंगावर येत होत्या. विशेषत: शहरात डांबरी रस्त्यांवरून चालताना अंगाला या झळा सोसवत नव्हत्या. आज, सोमवारीही पारा ४२ डिग्रीपर्यंत जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उद्या, मंगळवारपासून मात्र तापमानात घट होत जाईल, असा अंदाज आहे.

Web Title: The mercury of Kolhapur at 41 degrees