जनावरांच्या व्यापाऱ्यास मारहाण करुन लुटले

By Admin | Updated: May 16, 2017 18:45 IST2017-05-16T18:45:17+5:302017-05-16T18:45:17+5:30

पेठवडगाव-तासगाव रस्त्यावर अडवून मारहाण

The merchants of the cattle were beaten and looted | जनावरांच्या व्यापाऱ्यास मारहाण करुन लुटले

जनावरांच्या व्यापाऱ्यास मारहाण करुन लुटले

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १६ : पेठवडगाव-तासगाव रस्त्यावर जनावरांच्या व्यापाऱ्यास चौघा जणांनी अडवून मारहाण करुन ५९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. शंकर महादेव लोंढे (वय ४६, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) असे जखमीचे नाव आहे. त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. ही घटना सोमवारी रात्री घडली.

अधिक माहिती अशी, शंकर लोंढे हे जनावरांचे व्यापारी आहेत. सोमवारी रात्री दूचाकीवरुन ते पेठवडगावहून गावी निघाले होते. तासगाव रस्त्यावर येताच पाठिमागून दोन दूचाकीवरुन आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. मारहाण करुन त्यांच्या जवळील ५९ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. अचानक घडलेल्या याप्रकाराने लोंढे भयभित झाले. त्यांनी भाचा सयाजी श्रीपती कांबळे याला फोन करुन बोलवून घेतले. मारहाणीत ते जखमी झाले होते. त्यांना तेथून सीपीआरमध्ये दाखल केले. त्यांनी संशयित सतिश कांबळे, विकास कांबळे व अन्य दोघांनी मारहाण केल्याचे सीपीआर पोलिसांना सांगितले.

Web Title: The merchants of the cattle were beaten and looted