शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Lata Mangeshkar: लतादीदींचे कोल्हापूरशी होतं खास नातं, वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी यायच्या कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 11:43 IST

वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी त्या कोल्हापुरात यायच्या

कोल्हापूर : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सर्वसामान्य कुटुंबातील तरुणी ते गानसम्राज्ञी लता मंगेशकर या लतादीदींच्या जडणघडणीची मुळे कलापूर असलेल्या कोल्हापुरात रोवली गेली. लता मंगेशकर यांना दीनानाथ यांनी आपल्या फिल्म कंपनीत संधी दिली, त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही.अभिनेत्री म्हणून कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरातलता मंगेशकर या मूळच्या मध्यप्रदेशमधल्या. दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. आई माई मंगेशकर आणि उषा, आशा, मीना व हृदयनाथ यांच्यासह लतादीदी कोल्हापुरात आल्या. सुरुवातीच्या काळात मंगेशकर कुटुंब मंगळवार पेठ खरी कॉर्नर येथे बाबूराव पेंटर यांच्या घराजवळ राहायचे. कुटुंब चालवण्यासाठी त्या मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये काम करू लागल्या. त्यांची कारकीर्द खरंतर १९४२ च्या दरम्यान बालअभिनेत्री म्हणून सुरू झाली. पुढे मास्टर विनायक यांनी आपल्या फिल्म कंपनीचे मुंबईला स्थलांतर केल्यानंतर त्यांचे कर्मचारीही मुंबईला स्थायिक झाले. पुढे त्यांना भालजी पेंढारकर यांचा सहवास लाभला. भालजी कोल्हापुरात आल्यानंतरही त्यांचा लतादीदींशी स्नेह कायम होता. त्या वर्षातून दोन वेळा महिनाभर राहण्यासाठी कोल्हापुरात यायच्या. कोल्हापुरात फिरण्यासाठी एक गाडी मात्र त्यांच्यासाठी ठेवलेली असायची.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरLata Mangeshkarलता मंगेशकर