तात्यासाहेब कोरे यांना स्मृतिदिनी अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:44+5:302020-12-14T04:35:44+5:30
विश्वेश कोरे, जोतिरादित्य कोरे, डॉ. शरदिनी कोरे, स्नेहाताई कोरे, शुभलक्ष्मी कोरे व कोरे कुटुंबीयांनी तसेच वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, ...

तात्यासाहेब कोरे यांना स्मृतिदिनी अभिवादन
विश्वेश कोरे, जोतिरादित्य कोरे, डॉ. शरदिनी कोरे, स्नेहाताई कोरे, शुभलक्ष्मी कोरे व कोरे कुटुंबीयांनी तसेच वारणा समूहातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनीही तात्यासाहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. बहिरेवाडी येथील भजनी मंडळाने तात्यासाहेबांची प्रतिमा पालखीत ठेवून बहिरेवाडी ते वारणानगर सहकार दिंडी काढली. यामध्ये महिलांचाही सहभाग होता. तसेच वारणा भगिनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम पार पडला.
वारणा शिक्षण मंडळ संकुलात तात्यासाहेब कोरे यांच्या पुतळ्याचे पूजन व वारणा समूहातील सर्व संस्थांतून प्रत्येकी पाच प्रतिनिधींनी आणलेल्या प्रेरणा ज्योतींचे स्वागत झाले. त्यानंतर प्रेरणा ज्योतीचे दौडीने मुख्य मार्गावरून ‘तात्यासाहेब कोरे अमर रहे’च्या घोषणा देत वारणा शेतकरी कार्यालयासमोर समाधिस्थळी आली. तेथे मुख्य प्रेरणा ज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, दूध-साखर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड उपस्थित होते.
फोटो ओळी....वारणानगर येथे सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीचे पूजन वारणा बँकेचे अध्यक्ष निपुणराव कोरे यांच्या हस्ते झाले. सोबत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, किशोर पाटील, डॉ. प्रताप पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.