मेलडिअस ऋषी कार्यक्रम आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:20+5:302021-01-23T04:23:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे गेले दहा महिने बंद असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा आज, शनिवारी सांगीतिक ...

Melody sage program today | मेलडिअस ऋषी कार्यक्रम आज

मेलडिअस ऋषी कार्यक्रम आज

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनामुळे गेले दहा महिने बंद असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा आज, शनिवारी सांगीतिक कार्यक्रमाने उघडणार आहे. दिनेश माळी फौंडेशन व मेरी आवाज सुनोच्या वतीने मेलडिअस ऋषी हा सांगीतिक कार्यक्रम दुपारी चार वाजता सादर होणार आहे.

कोरोनामुळे सांगीतिक क्षेत्रावर अवकळा आली होती. आता मात्र पुन्हा नव्या जोमाने, नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने कलाकार सादरीकरणासाठी पुढे येत असून, शनिवारी या निमित्ताने नाट्यगृहात पडदा उघडणार आहे. यात भव्य रंगमंचासह कोल्हापुरातील गायक, वादकांसह १० कलावंत सादरीकरण करणार आहेत.

--

रविवारी नाट्यप्रयोग

नाट्यगृहात उद्या, रविवारी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाट्यप्रयोगाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. तसेच अभिनेता भरत जाधव यांचा ‘सही रे सही’ हा व्यावसायिक प्रयोगदेखील होणार आहे. त्यामुळे यापुढे कोल्हापूरकर रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.

.........................

Web Title: Melody sage program today